Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Bicholim Crime: चिंतेची बाब! डिचोलीतील चारपैकी तीन खून प्रकरणांचा परप्रांतीयांशी संबंध

Bicholim Crime News: डिचोली पोलिसांनी शीघ्रगतीने तपास करताना या चारही खून प्रकरणातील मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Murders

तुकाराम सावंत

डिचोली: डिचोली पोलिस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात गेल्या साडेतीन वर्षांत एका महिलेचा मिळून खुनाच्या चार घटना घडल्या आहेत. चिंतेची बाब म्हणजे चारपैकी तीन खून प्रकरणांशी परप्रांतीयांचा संबंध जोडलेला आहे. पैकी दोन खून डिचोली शहरात तर दोन खून कारापूर पंचायत क्षेत्रात घडले आहेत.

डिचोली पोलिसांनी शीघ्रगतीने तपास करताना या चारही खून प्रकरणातील मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले. अंगावर शहारे आणणाऱ्या आणि डिचोलीसह सर्वत्र खळबळ उडवून दिलेल्या बालक हत्या प्रकरणानंतर आता यापूर्वी डिचोलीत घडलेल्या खून प्रकरणांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

गेल्या शनिवारी (ता.२१) मध्यरात्री विठ्ठलापूर-कारापूर येथे मूळ उत्तरप्रदेशमधील समीर अली या अकरा वर्षीय बालकाचा निर्दयीपणे खून करण्याची घटना घडली आहे. या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाला योग्य दिशा देताना खून करून पसार झालेल्या चंदू पाटील या संशयित आरोपीस सहा तासांच्या आत अटक करण्यात यश मिळवले. दरम्यान, राज्यभरात वाढणारी गुन्हेगारी प्रकरणे पाहता नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. यामुळे पोलिस यंत्रणेच्या कारभाराबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले अाहे. तसेच रात्रीच्या वेळी वाढणाऱ्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

विठ्ठलापूर प्रकरणात अन्य एकाला अटक

विठ्ठलापूर-कारापूर येथे समीर अली या अल्पवयीनाच्या खूनप्रकरणात अन्य एका कामगाराला पोलिसांनी अटक केली आहे. भीम लालमण (मू. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या संशयित कामगाराचे नाव आहे. अल्पवयीनाचा खून करण्यासाठी भीम लालमण याने मुख्य संशयित चंदू पाटील याला मदत केल्याचे तपासात उघड झाल्यानंतर डिचोली पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली. संशयित चंदू याने ही माहिती उघड केल्यानंतर पोलिसांनी भीम याला अटक केली. तोही विठ्ठलापूर येथील डेअरी फार्ममध्ये काम करत होता.

वाठादेव परिसरात पतीने केला होता पत्नीचा खून

२०२२ साली मे महिन्यात रोलिंगमिल-वाठादेव परिसरात मूळ बिहारमधील बलराम यादव या कामगाराने आपल्या पत्नीला ठार केले होते. पत्नीला ठार केल्यानंतर संशयित बलराम यादव हा आपल्या तीन वर्षीय बालिकेला घेऊन पसार झाला होता. मात्र, मिळालेल्या धाग्यादोऱ्यांच्या आधारे पोलिसांनी संशयित बलराम याला अटक करण्यात यश मिळविले होते.

तत्पूर्वी मार्च २०२१ मध्ये ऐन शिमगोत्सव काळात बंदरवाडा-डिचोली येथे एका स्थानिक युवकाचा खून करण्यात आला होता. मद्याच्या नशेत खुनाचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी स्थानिक युवकाला खुनाच्या आरोपाखाली अटकही केली होती.

पत्नीकडूनच पतीचा काटा

गेल्यावर्षी २९ ऑगस्ट रोजी रात्री डिचोली शहरातील ‘सेतू संगम’ या प्रकल्पस्थळी मूळ हुक्केरी-बेळगाव येथील रमेश पोशालप्पा सिद्धागोळी (३९) या युवकाचा निर्दयीपणे खून करण्यात आला होता.

भावोजीच्या मदतीने पत्नीनेच पती रमेश याच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्दयीपणे हत्या केली होती.

या खूनप्रकरणी मूळ महाराष्ट्रातील संगीता रमेश सिद्धागोळी (२९) या महिलेसह कैलासनगर-अस्नोडा येथे राहणारा रामू शंकर गवळी (५०) या दोघाही संशयितांना पोलिसांनी आठ तासांच्या आत अटक करण्यात यश मिळवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Deepti Sharma: दीप्ती शर्मा रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारी ठरणार पहिली भारतीय; ऑस्ट्रेलियन खेळाडूचा रेकॉर्डही धोक्यात

Bangladesh Violence: दीपू दासनंतर बांगलादेशात अमृत मंडलची जमावाकडून हत्या, घरे पेटवली, मंदिरे फोडली; हिंदूंवरील अत्याचाराचं सत्र सुरुच

चिंबलमध्ये जनआंदोलन भडकले! निसर्ग रक्षणासाठी लढा; युनिटी मॉल, प्रशासन स्तंभ प्रकल्पाला विरोध

Chandra Gochar 2025: चंद्रदेवाची शतभिषा नक्षत्रात एन्ट्री! 'या' 3 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; नोकरीतील पदोन्नतीसह व्यवसायात होणार भरभराट

Goa Accident: शिवोली-मार्णा मार्गावर अपघाताचा थरार! चिरेवाहू ट्रकने दोन गाड्यांना उडवले, सुदैवाने जीवितहानी टळली

SCROLL FOR NEXT