Nuvem Theft: चोरीचा प्रयत्न फसला म्हणून दुकानदारावर केला हल्ला! पोलिसांकडून पाचजणांना अटक

Goa Theft News: कुलासो यांचे कार्मेल कॉलेजजवळ दुकान असून पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला
Goa Theft News: कुलासो यांचे कार्मेल कॉलेजजवळ दुकान असून पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला
Goa TheftCanva
Published on
Updated on

Nuvem Theft Case

मडगाव: कार्मेल कॉलेजजवळील एडमंड कुलासो यांच्‍या दुकानाचे शटर तोडून पाच चोरट्यांनी आत प्रवेश केला. मात्र आवाज ऐकून दुकान मालक काय झाले ते पाहायला गेले असताना चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला करत डोक्यावर जड वस्तूने प्रहार केला. त्यानंतर त्यांना धमकी देत आत दुकानातच कोंडून पळ काढला. या प्रकरणात मायणा-कुडतरी पोलिसांनी पाचजणांना अटक केली आहे.

मोठा आवाज झाल्याने दुकान मालक काय झाले ते पाहायला आला असता चोरीच्या उद्देशाने आलेल्या पाच चोरट्यांनी त्याला जबर मारहाण करून जिवंत मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात मायणा-कुडतरी पोलिसांनी पाचजणांना अटक केली.

ही घटना १९ रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी एडमंड कुलासो यांनी तक्रार दिली आहे. कुलासो यांचे कार्मेल कॉलेजजवळ दुकान असून पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. मात्र, यावेळी झालेला आवाज ऐकून दुकान मालक काय झाले ते पाहायला गेले असताना चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला करीत डोक्यावर जड वस्तूने प्रहार केला. त्यांनतर त्यांना धमकी देत आत दुकानातच कोंडून पळ काढला.

याप्रकरणी पोलिसांनी तपास करीत प्रकाश वेल्ला (मालभाट-मडगाव), सुनील बिलावर (बोर्डा), अहमद कलमाणी (पॉवर हाऊस), अल्ताफ शेख (पाजीफोंड) आणि मुदासीर शेख (हॉस्पिसियो मडगाव) या पाचजणांना अटक केली. या प्रकरणात उपनिरीक्षक संकेत नाईक हे पुढील तपास करत आहेत.

Goa Theft News: कुलासो यांचे कार्मेल कॉलेजजवळ दुकान असून पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला
Nuvem Highway: नुवे येथे महामार्ग रुंदीकरणाला स्थानिकांचा विरोध; खासदार फर्नांडिस यांनी दिली सर्वेक्षणाची खात्री

ज्‍येष्‍ठ महिलेची सोनसाखळी पळवली

लोनावडे भाट, अवेडे-कोठंबी येथील ७० वर्षीय ज्‍येष्‍ठ महिला इनासिया फर्नांडिस आपल्‍या घराच्‍या अंगणात सफाई करीत असताना दुचाकीवरून आलेल्‍या दोन अज्ञात संशयितांनी विचारपूस करण्‍याच्‍या निमित्ताने त्‍यांच्‍या गळ्‍यातील सोनसाखळी हिसकावून पलायन केले.

केपे पोलिसांनी पंचनामा केला असून संशयितांचा शोध सुरु केला आहे. याबाबत फर्नांडिस यांनी सांगितले की, घराच्‍या अंगणात झाडू मारत असताना दोघे दुचाकीवरून आले, त्‍यांनी माझ्‍याकडे काहीतरी चौकशी केली. अचानक माझ्‍या गळ्‍यात हात घालून सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून पळून गेले. दोघांचे चेहरे ओळखता आले नाही, असे त्यांनी सांगितले. दरम्‍यान, यापूर्वीही अशा दोन घटना घडल्‍याचे स्‍थानिक गजानन प्रभू देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com