Goa Murder Case
Goa Murder Case Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: अल्पवयीन मुलगी, वृद्ध महिला आणि दोन परप्रांतीय कामगार; गोव्यात 10 दिवसांत चार खून

Pramod Yadav

Goa Murder Case

अपघातांमुळे किलर स्टेट अशी ओळख निर्माण झालेला गोवा आता गुन्हेगारी क्षेत्रात देखील कुप्रसिद्ध होताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे अकाराने लहान असणाऱ्या गोव्यात गेल्या दहा दिवसांत चार खून झाले आहेत.

बरोबर दहा दिवसांपूर्वी अवघ्या साडेपाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून केल्याची घटना वाडे-दाबोळी येथे घडली होती. त्यानंतर आणखी तीन हत्येच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

वास्कोतील घटनेने हादरला गोवा

वाडे-दाबोळी येथे पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून केल्याची घटना 12 एप्रिल पहाटे तीनच्या सुमारास उघडकीस आली होती. एका निर्माणाधीन इमारतीवर मजुरी काम करणाऱ्या कामगाराची ती मुलगी होती.

याप्रकरणी पोलिसांनी मुरारी कुमार (वय २४) व उपमेश कुमार (वय २२) या दोन आरोपींना बलात्‍कार आणि खुनाच्या आरोपाखाली अटक केली होती, त्‍यांची रवानगी न्‍यायालयीन कोठडीत करण्‍यात आली असून सध्‍या त्‍यांची रवानगी कोलवाळ तुरुंगात करण्यात आली आहे.

लव्ह ट्रँगल प्रकरणातून पर्वरीत खून

पिळर्ण-पर्वरी ऑडिट भवनजवळ मंगळवारी (दि.16) 21 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. रेहबर खान (21, अमरोहा, उत्तरप्रदेश) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, तो एका सलूनमध्ये कामाला होता.

खून लव्ह ट्रँगलप्रकरणातून या तरुणाचा खून केल्याची माहिती तपासातून समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित विकास यादव याच्यासह खतेश कांदोळकर (कांदोळी), सुमन बरिक (ओर्डा कांदोळी), सचिन सहानी (ओर्डा कांदोळी), तनय कांदोळकर (कांदोळी) व सचिन सिंग (कांदोळी) यांना अटक केली. सर्वजण सध्या पोलिस कोठडीत आहेत.

न्हयबाग येथे पूर्ववैमनस्यातून मजुराचा खून

न्हयबाग येथील तेरेखोल नदीत शनिवारी (दि.२० एप्रिल) अबनेजर मुल नबीन कुल्लू (४७, सिमडेगा, झारखंड) या मजुराचा मृतदेह आढळून आला. अबनेजर यांचा मृतदेह आढळला त्यावेळी त्यांच्या गळ्याला नायलॉनची दोरी आढळून आली होती.

दरम्यान, हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याची माहिती समोर आली असून. पोलिसांनी सतीश कुल्लू आणि जुनेल कुल्लू या दोघांना अटक केलीय. सर्वजण विविध ठिकाणी काजू बागायतीत मजुरीकाम करायचे अशी माहिती समोर आलीय.

वास्कोत वृद्धेची गळा चिरुन हत्या

वास्कोत ८३ वर्षीय वृद्ध महिलेचा अज्ञाताने धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याने खळबळ उडाली. वास्को-पिशीडोंगरी येथे रविवारी (दि.२१) ही घटना घडली असून गायत्री मराठे असे दुर्दैवी महिलेचे नाव आहे.

या महिलेच्या गळ्यावर सुरीने वार केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासकार्याला सुरवात केली आहे. हल्लेखोराबाबत अद्याप काहीच माहिती मिळालेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT