Vasco Traffic Police  Dainik Gomantak
गोवा

Vasco News: आली लहर केला कहर! वास्कोतील चार अल्पवयीन मुलांना 'बाईक राईड' पडली महागात

वास्कोत वारंवार अल्पवयीन मुले बेकायदेशीररीत्या वाहने चालवताना आढळून आले आहेत.

Pramod Yadav

Vasco News: गोव्यात वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे वाहतूक नियम अतिशय सक्त करण्यात आले आहेत. नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरोधात तात्काळ कारवाई केली जात आहे.

वास्कोत अल्पवीयन मुलांना दुचाकी चालवत असताना झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर अल्पवयीन मुलांना दुचाकी चालविण्यास देऊ नये अशी सक्त ताकीद देण्यात आली.

दरम्यान, वास्कोत चार अल्पवयीन मुले दुचाकी चालविताना आढळून आले आहेत.

वास्को वाहतूक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वास्कोत चार अल्पवयीन मुले दुचाकीवरून फिरताना पोलिसांना आढळून आले. ऑक्टोबर 2022 ते फेब्रुवारी 2023 या काळात या घटना घडल्या आहेत. पोलिसांकडून चौघांची मेरशी येथील अपना घरात रवानगी करण्यात आली आहे. ही मुले 14 मार्चपर्यंत अपना घरात राहणार आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

वास्कोत वारंवार अल्पवयीन मुले बेकायदेशीररीत्या वाहने चालवताना आढळून आले आहेत. अल्पवयीन बालकांना वाहन चालविण्यासाठी देऊ नका असे आवाहन पोलिस आणि प्रशासनाकडून करण्यात आली. पण, तरी देखील अल्पवयीन मुले आली लहर केला कहर अशा पद्धतीने वागताना दिसत आहेत.

ऑक्टोबर 2022 मध्ये एक, डिसेंबर महिन्यात दोन, जानेवारी 2023 मध्ये एक आणि फेब्रुवारीमध्ये एका अल्पवयीन मुलाला दुचाकी चालविताना ताब्यात घेतले. दरम्यान, त्यांना ज्युवेनाइल जस्टीस बोर्डासमोर मंगळवारी हजर करण्यात आले. दरम्यान, चारही मुले 28 फेब्रुवारी ते 14 मार्चपर्यंत अपना घरात राहणार आहेत.

अल्पवीयन मुलांना दुचाकी चालविण्यासाठी दिल्यास मुलाच्या पालकांवर किंवा बाईक मालकावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे यापूर्वी सरकारने स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT