Goa Accident  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident : राज्यात चार अपघातांत चार ठार

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Accident :

पणजी, काणकोण, शिवोली राज्यात आज चार वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत चौकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

माशे येथे कारने बसला दिलेल्या धडकेत कारचालक जागीच ठार झाला, तर पाचजण गंभीर जखमी झाले. मोले येथे एका कारने झाडाला धडक देऊन झालेल्या अपघातात चालकासह कारमधील दोघांचा मृत्यू झाला. नागवा-हडफडे येथे जेसीबी यंत्राखाली चिरडून एकाचा मृत्यू झाला.

माशे येथे मडगाव-कारवार महामार्गावर कदंब बस व कारमध्ये आज सकाळी ८.४५ च्या सुमारास अपघात होऊन कारचालक राजेश वेर्णेकर (वय ४९) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर कारमधील प्रवासी अंजली वेर्णेकर (वय ४९), रामदास वेर्णेकर (वय २९), करिष्मा वेर्णेकर (वय ५५), अनुषा वेर्णेकर (वय २१), ट्विंकल कोलवेकर (वय १८) हे पाच प्रवासी

गंभीर जखमी झाले. वेर्णेकर कुटुंबीय कारवार येथून जीए - ०५ - बी - ४७२१ क्रमांकाच्या कारने फोंडा येथे जात होते, तर जीए - ०८ - व्ही - ५०७२ क्रमांकाची इलेक्ट्रिक कदंब बस मडगावहून कारवारला जात होती. स्थानिकांनी कारमध्ये अडकलेल्या कारचालकाला चेंदामेंदा झालेल्या कारमधून बाहेर काढले. मात्र, त्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारानंतर मडगाव येथील जिल्हा इस्पितळात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघातात कदंब इलेक्ट्रिक बसचा चालक लवकुश वेळीप व प्रवासी रोबिना फकीर हे किरकोळ जखमी झाले.

अग्निशमन दलाचे कर्मचारी व काणकोणचे पोलिस निरीक्षक हरिश राऊत देसाई पोलिस कुमक घेऊन घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मदत कार्य सुरू केले. ज्या ठिकाणी हा अपघात झाला, त्या ठिकाणी हमरस्त्याला तीव्र वळण आहे. या वळणावर कारचालकाचा कारवरील ताबा जाऊन कारने कदंब बसला जोरदार धडक दिली.

जेसीबीखाली झोपलेला चिरडला

कळंगुट (प्रतिनिधी): नागवा - हडफडे पंचायत क्षेत्रात संदीप गॅरेज परिसरात जेसीबी वाहनाखाली विश्रांतीसाठी झोपलेल्या प्रशांत पवार या कामगाराचा जेसीबीचालक राजेंद्र शिरोडकर याने वाहन सुरू करून पुढे घेतल्याने चिरडून जागीच मृत्यू झाला.

आपत्कालीन १०८ सेवेद्वारे जखमी प्रशांत पवार याला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचारासाठी दाखल केले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रशांतचा भाऊ अनिल पवार यांनी हणजुण पोलिसांत तक्रार दाखल करताच चालक राजेंद्र शिरोडकर याच्या विरोधात पोलिसांकडून सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार राजेंद्र शिरोडकर याची सध्या जामिनावर सुटका करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हणजुणेचे पोलिस उपनिरीक्षक रमेश हरिजन करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

SCROLL FOR NEXT