Corlim Old Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Corlim Accident: खोर्लीत विचित्र अपघात! अपघातग्रस्त टेंम्पोतील शीतपेयांच्या बाटल्या घेण्यासाठी झुंबड; वाहतूकीमुळे पोलिसांची दमछाक

गोमन्तक डिजिटल टीम

Multiple vehicle collision near Corlim railway bridge in Old Goa

पणजी: जुने गोवे येथील खोर्ली रेल्वे पुलाजवळ मालवाहू टेंपो, कार व दोन स्कुटर्स यांच्यात झालेल्या अपघातात एका महिलेसह चारजण जखमी झाले. फोंडा दिशेने जाणाऱ्या टेंपोने समोरून येणाऱ्या दोन स्कुटर व कारला धडक दिली. हा अपघात आज दुपारी १ च्या सुमारास घडला.

टेंपो रस्त्याच्या मधोमध उलटल्याने रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊन सुमारे एक तास वाहतूक कोंडी झाली. अपघातातील चौघा जखमींना गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले. अपघातग्रस्त मिनी टेंपोमधील शीतपेये बाटल्या रस्त्यावर पडल्याने त्या गोळा करण्यासाठी तेथील उपस्थित लोकांची एकच झुंबड उडाली.

शीतपेयेवाहू टेंपो आज दुपारी जुने गोवे येथून फोंड्याच्या दिशेने जात होता. खोर्ली येथील रेल्वे पुलावरून भरधाव वेगाने जात असताना चालकाचे नियंत्रण जाऊन त्याने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली.

या धडकेने हा टेंपो रस्त्यावरच उलटला. या अपघातात दोन स्कुटरनाही धडक बसली. एका स्कूटरवरील महिलेच्या पायाला जबर मार बसला आहे, तर कार चालकासह इतर तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे. या जखमींना १०८ रुग्णवाहिकेने गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले.

अग्निशमन दलाच्या जवांनानी उलटलेला टेंपो अग्निशमन बंब वाहनाने रस्त्यावरून बाजूला केला. त्यामुळे सुमारे एक तासाहून अधिक वेळ कोंडी झालेली वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी टेंपो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुपारी १ च्या सुमारास या रस्त्यावर मोठी वर्दळ असते त्यामुळे अपघातानंतर वाहनांच्या या रस्त्यावर लांब रांगा लागल्या. अपघातग्रस्त वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. याप्रकरणी जुने गोवे पोलिस तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajay Devgan - Kajol Goa Villa: अजय देवगन - काजोलच्या गोव्यातील अलिशान व्हिलात राहण्याची संधी; एका रात्रीसाठी मोजावे लागणार 'एवढे' रुपये

Dabolim Airport: खराब हवामानाचा फटका; दाबोळीवर उतरणारी पाच विमाने इतरत्र वळवली

चीनचे धाबे दणाणले! नाटो सदस्य इटलीचा भारतीय नौदलासोबत ऐतिहासिक सराव, गोव्याच्या समुद्रात सहा दिवस रंगला थरार

गोव्यात पुन्हा दाणादाण! जोराचे वारे आणि विजांचा कडकडाट; काही ठिकाणी 24 तास बत्ती गुल

Saint Francis Xavier: सेंट फ्रान्सिस झेवियरचा केला होता ‘भारतातील महान पुरुष’ असा गौरव! पहिले टपाल तिकीट कधी?

SCROLL FOR NEXT