Zuari River : झुआरी नदीपात्रात तीन तास थरार! वादळी वाऱ्यामुळे फेरीबोट भरकटली; शेकडो जणांचा जीव मुठीत

Zuari River ferry boat incident: कुठ्ठाळीहून मडकईला जाणारी फेरीबोट जोरदार वाऱ्यामुळे आज सायंकाळी भरकटली आणि शंभरेक जणांना तीन तास नदीच्या पात्रात जीव मुठीत धरून काढावे लागले. झुआरी ही फेरीबोट अखेर रात्री पावणे दहा वाजता सुमारास मडकईला पोचली.
Zuari Ferry Boat
Zuari Ferry BoatCanva
Published on
Updated on

Ferry Boat From Cortalim to Madkai in Zuari River

कुठ्ठाळी: कुठ्ठाळीहून मडकईला जाणारी फेरीबोट जोरदार वाऱ्यामुळे आज सायंकाळी भरकटली आणि शंभरेक जणांना तीन तास नदीच्या पात्रात जीव मुठीत धरून काढावे लागले. झुआरी ही फेरीबोट अखेर रात्री पावणे दहा वाजता सुमारास मडकईला पोचली.

सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० या दरम्यान ती नदी पात्रात साचलेल्या गाळाला अडकली होती. या फेरीबोटीत नेहमीत गर्दी असते. कामावरून घरी जाणारे अनेकण ६.१० च्या या फेरीबोटीला पसंती देतात कारण नंतरही फेरीबोट ही साडेसहा वाजता असते. आजही ८० जण, ३५ दुचाक्या, एक चारचाकी फेरीबोटीत होती. फेरीबोट नेहमीप्रमाणे संथपणे मडकईला निघाली असता निम्म्या वाटेवर असताना जोरदार वारा वाहू लागला.

सोबत धो धो पाऊस कोसळू लागला. दृश्यमानता शून्य झाल्याने फेरीबोट कुठे जात आहे, हेच कोणाला समजत नव्हते. तरीही प्रवासी हे अनुभवी असल्याने ते शांत राहिले. फेरीबोट उजवीकडे खेचली जाऊ लागली. तेथे उथळ पाणी असल्याचे लक्षात आल्याने चालकाने ती डाव्याबाजूला वळवली. वेगही थोडा वाढवला. डाव्या बाजूला गाळ साचल्याने पाणी उथळ झाले आहे. तेथे फेरीबोट फसली होती. भरतीनंतर ती बाहेर काढता आली.

मुख्यमंत्र्यांकडून दखल

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या घटनेची माहिती संचालक विक्रम राजेभोसले यांच्याकडून जाणून घेतली. हवामानाचा अंदाज घेत फेरीबोट सेवा सुरू ठेवायची की नाही याचा निर्णय केला गेला पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली आहे.

Zuari Ferry Boat
Cortalim News: ही तर जनतेची फसवणूक! कुठ्ठाळी भूस्खलनावरून महामार्ग रोखण्याचा पाटकर यांचा इशारा

तीन तास प्रयत्न

चालक गजानन नाईक, मशिनिस्ट उद्धव गावकर, खलाशी रवींद्र गावडे व प्रदीप मखर्णे यानी प्रयत्न सुरु केले. त्यातच दोन तास गेले. त्यानंतर ती बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. तेथे उथळ पाणी असल्याने दिवाडी ही दुसरी फेरीबोटही मदतीला पाठवता येईना.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com