मडगाव किनारपट्टी क्षेत्र जन सुनवाणीत गोंधळ Dainik Gomantak
गोवा

Gajanan Sawant Attack: मुंबई HC ची गोवा सरकारला नोटीस, 6 दिवसांत उत्तर देण्याचे आदेश

चार पोलीस कर्मचारी निलंबित

दैनिक गोमंतक

वकील गजानन सावंत यांना पर्वरी पोलिसांकडून मारहाण झाल्याचे प्रकरण गोव्यात चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात न्यायालयाने आज गोवा सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक दिवस संशयितांना अटक झाली नसल्याने ॲडव्होकेट असोसिएशने आवाज उठवल्यानंतर चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच न्यायालयाने ही या प्रकरणात गोवा सरकारला आदेश दिले आहे.

(Four Goa policemen suspended in lawyer Gajanan Sawant beating case)

मिळालेल्या माहितीनुसार उच्च न्यायालयाकडून गोवा सरकारला गजानन सावंत मारहाण प्रकरणी 20 डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात पोलीस महासंचालक, गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक, पर्वरी पोलीस निरीक्षक व चार पोलिसांना प्रतिवादी करण्यात आले आहे. थेट मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे वकील गजानन सावंत मारहाण प्रकरणाने आता वेग घेतल्याचे चित्र आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?

अ‍ॅड. गजानन सावंत यांना दिनांक 9 डिसेंबर रोजी मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणात पर्वरी पोलिसांनी वकील संघटनेच्या मागणीनंतर चार संशयित पोलिस कर्मचाऱ्यांसह एकूण सहा जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

बरेच दिवस संशयितांना अटक झाली नसल्याने ॲडव्होकेट्स असोसिएशने धरणे आंदोलन सुरु केले आणि या प्रकरणाची दखल थेट मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना घ्यावी लागली. सध्या या प्रकरणात चार पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. व या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: 'कॅश फॉर जॉब प्रकरण'; काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

Nagarjuna At IFFI 2024: नागार्जुन यांचा इफ्फीत जलवा! दाखवली नृत्याची झलक; स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाबाबत म्हणाले की..

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: सिनेविश्वातील महिलांच्या सुरक्षेबाबत भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान, 'पॉवर प्ले आहे पण..'

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT