Goa Police: वकील मारहाण प्रकरण! खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार पोलिसांवर गुन्हा दाखल

Goa: वकील संघटनेच्या मागणीनंतर 4 संशयित पोलिस कर्मचाऱ्यांसह एकूण 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Advocate
AdvocateDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa: अ‍ॅड. गजानन सावंत यांना झालेल्‍या मारहाणप्रकरणी पर्वरी पोलिसांनी शुक्रवारी वकील संघटनेच्या मागणीनंतर चार संशयित पोलिस कर्मचाऱ्यांसह एकूण सहा जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस हवालदार संदीप परब यांच्यासह इतर तीन अज्ञात पोलिस कर्मचारी तसेच विजय सामती व त्यांच्‍या पत्नीविरोधात पर्वरी पोलिसांनी भादंसंच्या कलम 143, 147, 148, 307, 504, 506(2) व 149 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अ‍ॅड. सावंत यांच्या पत्नीने याप्रकरणी तक्रार नोंदवली आहे.

Advocate
Goa Petrol-Diesel Price: दक्षिण गोव्यातील पेट्रोल-डिझेलचे भाव वधारले, जाणून घ्या आजचे दर

शांतीनगर-पर्वरी येथील एका इमारतीमध्ये पोलिस कर्मचारी आणि वकिलांमध्ये वाद होऊन प्रकरण हातघाईवर आले होते. त्‍यात अ‍ॅड. गजानन सावंत हे जखमी झाले होते. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. अशिलाच्या वादग्रस्त फ्लॅटसंदर्भात अ‍ॅड. सावंत हे घटनास्थळी गेले होते. या मारहाण प्रकरणाचा अ‍ॅडव्होकेट फोरमतर्फे निषेध नोंदविण्‍यात आला.

वकिलांची पोलिस स्थानकावर धडक

शुक्रवारी सायंकाळी अ‍ॅडव्होकेट फोरमने पर्वरी पोलिस स्थानकावर धडक देऊन उपअधीक्षक विश्वेश कर्पे आणि पोलिस निरीक्षक अनंत गावकर यांची भेट घेऊन या प्रकरणात गुंतलेल्या पोलिसांवर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. यावेळी वकील संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने पोलिस स्थानकाच्या आवारात जमले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com