Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress : गोवा काँग्रेसचे तीन दिग्गज आमदार भारत जोडोमध्ये सामिल; राहूल गांधी यांची राजस्थान येथे घेतली भेट

लोकशाही वाचवण्यासाठी 'भारत जोडो'ची महत्त्वाची भुमिका

दैनिक गोमंतक

गोवा काँग्रेसच्या चार दिग्गज नेत्यांनी राजस्थान येथे भारत जोडो यात्रेत आज सहभाग नोंदवला. लोकशाही वाचवण्यासाठी आणि लोकांचा आवाज बनण्याच्या एका महान क्षणात सहभागी होता आले असल्याचे समाधान आहे. असे काँग्रेस नेते अमित पाटकर यांनी यासहभागाबाबत माहिती देताना सांगितलं

(Four Goa Congress MLAs have met Rahul Gandhi while participating in Bharat Jodo Yatra in Rajasthan)

याबाबत माहिती देताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, सध्या आम्ही राजस्थान येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झालो आहोत. यावेळी आम्ही काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेते सचिन पायलट यांची देखील भेट घेतली आहे.

या प्रवासादरम्यान आम्ही अविस्मरणीय अनुभव घेत असून संपुर्ण यात्रेदरम्यान प्रवास करणाऱ्या यात्रेकरुंचे देखील अनुभव ऐकत आहोत. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची भारत जोडो यात्रेचा आपल्या उद्देश्यापर्यंत निश्चित पोहोचेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

याबाबत बोलताना गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, लोकशाही वाचवण्यासाठीच्या आणि लोकांचा आवाज बनण्याच्या एका महान क्षणात सहभागी होण्याचे भाग्य मला व माझ्या सहकाऱ्यांना मिळाले आहे. या चळवळीमुळे देशातील लोकशाहीची मुल्य अधिक घट्ट होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. या यात्रेत गोवा काँग्रेसचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, हळदोणाचे आमदार कार्लोस फरेरा, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी देखील सहभाग नोंदवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

Goa Live News: वाळपईत वाहतूक कोंडी

MLA Disqualification Petition: गोव्यातील ‘त्या’ 8 आमदारांच्या भवितव्याचं काय? चोडणकरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी!

Goa Opinion: देशाचा असो वा गोव्याचा असो, शेवटी हुकमाचा एक्का हा मतदार असतो..

डिचोलीच्या दहीहंडीत आमदारांनी धरला ठेका, Video Viral!

SCROLL FOR NEXT