Arrest Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: सांताक्रुझ हल्लाप्रकरणात चौघांना अटक; अल्पवयीन संशयिताची रवानगी ‘अपना घर’मध्‍ये

Goa Crime News: दोघांना गोव्यातून तर दोघांना सांगली-महाराष्ट्र येथे अटक करण्यात पोलिसांना यश आले

गोमन्तक डिजिटल टीम

तिसवाडी: सांताक्रुझ येथे एका व्यक्तीवर झालेल्या खुनी हल्लाप्रकरणात जुने गोवे पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. दोघांना गोव्यातून तर दोघांना सांगली-महाराष्ट्र येथे अटक करण्यात पोलिसांना यश आले. अटक करण्यात आलेल्यांपैकी एक अल्पवयीन आहे, अशी माहिती जुने गोवे पोलिस निरीक्षक सतीश पडवळकर यांनी दिली.

सदर घटना काल दि. ३१ ऑगस्ट रोजी रात्री नऊच्‍या सुमारास घडली होती. तक्रारदार लतीफ तलवय (२५, इंदिरानगर-चिंबल) हा सांताक्रुझ येथील एका बारजवळ उभा होता. तेव्हा संशयित अनिल गुदिन्हो (३०, जुने गोवे), सुनील गुदिन्हो (जुने गोवे) आणि तीन अज्ञात मागून आले. त्‍यांनी फुटलेल्या बाटल्‍यांनी लतीफवर प्राणघातक हल्ला केला. त्यात त्‍याच्‍या पाठीवर आणि पोटावर गंभीर जखमा झाल्या. जुने गोवे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १८८९ (२), १९१ (२), १९१ (३), १०९ आर/डब्लू १९० अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

तपासासाठी तीन पथके

पोलिसांनी तपासासाठी तीन पथके गठित करून संशयित आरोपींचा शोध घेणे सुरू केले. तेव्‍हा अनिल गुदिन्हो आणि अल्पवयीन हे दोघे मेरशी येथे सापडले. तर इतर दोघांना सांगलीतून ताब्‍यात घेण्‍यात आले. अल्पवयीन संशयिताची रवनागी मेरशीतील ‘अपना घर’मध्‍ये करण्‍यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

SCROLL FOR NEXT