पेडणे: सुकाळे-कोरगाव येथे काल घडलेले सव्वा वर्षाच्या मुलाचे अपहरणनाट्य हे वर्गमित्र असलेल्या दोन पोलिसांशी संबंधित आहे. त्यामुळे केवळ खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते की या प्रकरणाला आणखीन कोणता कोन आहे, याची माहिती पेडणे पोलिस घेत आहेत.
मुलाचे वडील कमलेश वेंगुर्लेकर हे गोवा सशस्त्र पोलिस दलात कार्यरत आहेत तर या प्रकरणातील मुख्य संशयित निकेश च्यारी हाही याच दलात काम करतो. यामुळे वैयक्तिक वाद की अन्य कोणता कौटुंबिक विषय याला कारणीभूत आहे याची शक्याशक्यता पडताळून पाहण्यात येत आहे.
सुकाळे येथे काल रात्री हा प्रकार घडला होता. व्हरांड्यात सफरचंद खात असलेल्या मुलाला घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या संजय नार्वेकर याला लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यावेळी संशयिताचा साथीदार असलेला मोटारसायकलस्वार पसार झाला होता. संजय नार्वेकरची कोठडीत चौकशी केल्यानंतर निकेश च्यारी याचे नाव समोर आल्याने पोलिसांनी आज त्याला ताब्यात घेतले. वेंगुर्लेकर व च्यारी हे दोघेही पोलिस असल्याचे आढळून आले. एवढेच नव्हे तर ते वर्गमित्रही असल्याचे निष्पन्न झाले.
गोव्यात पर्यटनासाठी आले होते. त्यांचा एस्कॉर्ट संकेतस्थळावर संशयित महिलांशी संपर्क झाला. हॉटेलच्या खोलीवर गेल्यावर संशयित महिलांनी दोन्ही पर्यटकांना मारहाण केली. तसेच पैसे न दिल्यास पोलिसांत बलात्कार केल्याची तक्रार करू, अशी धमकी दिली. त्यामुळे दोन्ही पर्यटकांनी घाबरून नाईलाजास्तव संशयित महिलांच्या बँक खात्यात २० हजार रुपयांची रक्कम जमा केली. त्यानंतर संशयित महिला घटनास्थळावरून पसार झाल्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.