Manohar International Airport At Mopa Dainik Gomantak
गोवा

Mopa International Airport : मोपावरून दिवसाला टॅक्सींच्या साडेचार हजार ट्रिप्स

दरदिवशी 36 विमाने : आतापर्यंत सहा लाख प्रवाशांचे आगमन; रोजगारासाठी स्थानिकांची धडपड

दैनिक गोमन्तक डिजिटल

मोपा विमानतळावरून दरदिवशी 36 विमाने ये-जा करतात. त्यातून आतापर्यंत सहा लाख प्रवाशांचे आगमन झाले आहे. दरदिवशी टॅक्सी व्यावसायिक प्रवाशांना घेऊन साडेचार हजार ट्रिप्स मारत असल्याचे समजते. तसेच जेव्हा आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होईल तेव्हा आणखीही टॅक्सींची आवश्‍यकता भासणार आहे.

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पूर्ण पेडणे तालुक्याचा कायापालट होत आहे. त्या नजरेतून आता आमदार जीत आरोलकर व आमदार प्रवीण आर्लेकर यांनी पुढाकार घेऊन मोपा विमानतळावरील व्यवसाय व रोजगार आपापल्या भागातील नागरिकांना, व्यावसायिकांना कसे मिळतील यासाठी प्रयत्न करावेत, अशी जोरदार मागणी सध्या नागरिकांकडून केली जात आहे.

पर्यटनमंत्री रोहन खंवटे व वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी मोपा विमानतळ सुरू होण्यापूर्वी व झाल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना ज्या मतदारसंघात हा प्रकल्प उभा राहिला त्या मतदारसंघातील आमदार प्रवीण आर्लेकर यांना विश्वासात घेतलेले नाही.

त्यामुळे अधिकाऱ्यांबरोबर या दोन्ही मंत्र्यांनी कसल्या प्रकारची चर्चा केली? हे गुपितच आहे. या दोन्ही मंत्र्यांच्या समर्थकांच्या मोपा विमानतळावर मोठ्या प्रमाणात टॅक्सी सुरू असल्याची माहिती आहे.

मोपा विमानतळावर ज्या नोकऱ्या किंवा व्यवसाय आहेत ते स्थानिकांना उपलब्ध होत नसल्यामुळे थोडी खुशी आणि थोडा गम अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यावर उपाययोजना म्हणून लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करायला हवेत. अन्यथा बिगर गोमंतकीयांनाच नोकऱ्या मिळू शकतात.

अजूनही मिळाली नाही नुकसान भरपाई

मोपा विमानतळासाठी ज्यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी गेलेल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्याची कारणेही अनेक आहेत. ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांचे पैसे सरकारी तिजोरीत जमा केलेले आहेत. परंतु त्यांचे दावे-प्रतिदावे आणि त्यांच्या जमिनीवरील

हक्क ते व्यवस्थित सिद्ध करू न शकल्यामुळे त्यांना पैशांचा लाभ झाला नाही. वारस हक्क आणि त्यांचे प्रमाणपत्र सादर न झाल्यामुळे हा घोळ निर्माण झाला आहे.

वारखंडमधील 90 टक्के शेतकरी वंचित

विमानतळासाठी मोपा, चांदेल, कासारवर्णे, उगवे, वारखंड या गावांच्या जमिनी गेलेल्या आहेत. चांदेल पंचायत क्षेत्रातील ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, त्या 50 टक्के पीडित शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला आहे.

मोपा पंचायत क्षेत्रातील 80 टक्के लोकांनी आपले हक्क सादर करून पैसे घेतलेले आहेत. मात्र, वारखंड पंचायत क्षेत्रातील एकूण 90 टक्के शेतकऱ्यांना अजून पैसे मिळालेले नाहीत. त्यामागेही अनेक कारणे आहेत.

युवकांनी प्रशिक्षण घेऊन रोजगार मिळवावा

जीएमआर कंपनीने हा प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न केले आहेत. कंपनीने याच प्रकल्पाच्या अंतर्गत प्रशिक्षण केंद्र उभारून वेगवेगळ्या एकूण 17 कोर्सच्या प्रशिक्षणवर्गांची सोय केलेली आहे. त्यात युवकांनी या प्रकल्पांद्वारे प्रशिक्षण घेऊन आपल्या नोकरीसाठी प्रयत्न करावेत.

एकदा प्रशिक्षण घेतले की विविध माध्यमांतून किंवा विमानतळाच्या पलीकडेदेखील आपल्याला चांगल्या प्रकारची नोकरी मिळू शकते, त्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यायला हवा.

टॅक्सी व्यावसायिकांचा तिढा कायम

पेडणे तालुक्यातील ज्यांच्या जमिनी मोपा विमानतळासाठी गेलेल्या आहेत, त्या शेतकऱ्यांनी टॅक्सी विकत घेऊन व्यवसाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु टॅक्सी व्यावसायिकांमध्ये तीन गट तयार झाल्यामुळे त्यांचा प्रश्न आजपर्यंत सुटलेला नाही. परंतु मिळालेल्या माहितीनुसार, राज्यकर्त्यांनीच आपला फायदा उठविण्यासाठी हा विषय पेटत ठेवल्याचे बोलले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT