वास्को: गोव्यात प्रथमच फॉर्म्युला-४ रेससारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय इव्हेंटचे आयोजन केले जात आहे. हा उपक्रम गोव्यासाठी एक महत्त्वपूर्ण संधी असून, या निमित्ताने राज्य सरकारने ही शर्यत आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) मंत्री दिगंबर कामत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
मंत्री दिगंबर कामत यांनी सोमवारी (७ संप्टेंबर) येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, फॉर्म्युला-४ रेस नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे आणि या रेससंबंधी कोणतीही अडचण उद्भवल्यास स्थानिक आमदार संकल्प आमोणकर किंवा संबंधित अधिकारी ती सोडवतील.
मंत्री कामत म्हणाले, “या रेससंबंधी काही समस्या किंवा चिंता असतील, त्या दूर करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू. फॉर्म्युला-४ रेस ही गोव्यासाठी महत्वाची संधी आहे आणि आम्ही रेसचे आयोजन वेळेत आणि सुरक्षित पद्धतीने करू.”
दरम्यान, मुरगावातील काही नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या रेसविरोधात आवाज उठवला होता. स्थानिक नागरिकांनी रेसच्या मार्गाबाबत चिंता व्यक्त केल्या आहेत, विशेषतः स्मशानभूमीच्या जवळच्या मार्गांबाबत.
यावर मंत्री कामत यांनी स्पष्ट केले की, “रेसच्या मार्गाचे नियोजन करताना योग्य तो मार्ग निवडला जाईल. स्मशानभूमी व इतर संवेदनशील भागांमधून मार्ग काढण्याची व्यवस्था करण्यात येईल. लोकांच्या मनातील भीती आणि समस्या दूर करण्यात येतील.”
फॉर्म्युला-४ रेससाठी सर्व आवश्यक तयारी जोरात सुरू आहे. प्रशासननाने रेसच्या सुरक्षेसाठी आणि मार्गाच्या व्यवस्थेसाठी विशेष नियोजन केले आहे. या रेसमुळे गोव्यातील पर्यटन, स्थानिक अर्थव्यवस्था आणि खेळांच्या क्षेत्रात मोठा फायदा होईल, असा अंदाज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.