Formula 4 Racing In Goa Dainik Gomantak
गोवा

Formula 4 Race Goa: ‘फॉर्म्युला 4’ रेससाठी नव्या जागेचा शोध! बांबोळी, वेर्णा पठाराची पाहणी; सलग 3 वर्षे होणार आयोजन

Goa Motorsport Event : बोगदा येथे फॉर्म्युला ४ शर्यतीला विरोध झाल्यानंतर नव्या जागेचा शोध आयोजकांनी सुरू ठेवला आहे. बांबोळीचे पठार आणि वेर्णाच्या पठाराची पाहणी यासाठी करण्यात आली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: बोगदा येथे फॉर्म्युला ४ शर्यतीला विरोध झाल्यानंतर नव्या जागेचा शोध आयोजकांनी सुरू ठेवला आहे. बांबोळीचे पठार आणि वेर्णाच्या पठाराची पाहणी यासाठी करण्यात आली होती.

वेर्णा आणि बांबोळीच्या जागेविषयी आयोजक खूश नाहीत. त्यांनी राज्य सरकारला आम्ही नव्या जागेचा शोध घेत आहोत असे कळवले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जागेची निश्चिती करणे ही आयोजकांची जबाबदारी आहे.

येत्या ८-१० दिवसांत आयोजक त्याविषयी सरकारला कळवतील. त्यानंतर तेथे सुविधांची उभारणी करण्यासाठी सरकार पावले टाकेल. राज्य सरकारने त्यासाठी ५७ कोटी रुपये खर्च करण्याची तयारी केली आहे. सलग तीन वर्षे ही स्पर्धा राज्यात आयोजित केली जाणार आहे.

गोव्यात होऊ घातलेली आंतरराष्ट्रीय मोटारशर्यत ‘फॉर्म्युला ४’ ही बोगदा परिसरात होणार होती. मात्र स्थानिकांचा विरोध झाल्यामुळे आता वेर्णा आणि बांबोळी परिसरातील जागांची पाहणी आयोजकांनी केली. मात्र ती ठिकाणे त्यांना योग्य वाटली नाहीत. त्यामुळे आता राज्यात अन्य ठिकाणी योग्य जागा मिळू शकते का, याचा शोध आयोजकांकडून सुरू आहे.

राज्य सरकारचे मत आहे की, अशी स्पर्धा गोव्यात झाली तर त्यातून पर्यटन, स्थानिक रोजगार आणि राज्याची ओळख वाढण्यास मदत होईल. मात्र, सुरक्षितता आणि नागरिकांची संमती यांना प्राधान्य देऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल.

स्पर्धेसाठी लागणारी जागा

या स्पर्धेसाठी सरळ-वळणदार रस्त्यांचा मिळून सुमारे तीन ते चार किलोमीटर लांबीचा मार्ग आवश्यक असतो. केवळ शर्यतीचा रस्ता नव्हे, तर त्यासोबतच वाहनतळ, प्रेक्षक बसण्यासाठी जागा, वाहनांच्या तपासणीची जागा, चालकांसाठी व्यवस्था, तसेच माध्यम आणि वैद्यकीय सुविधा यांसाठीही मोठा मोकळा परिसर लागतो.

आवश्यक सुविधा

वाहनांची तपासणी व दुरुस्ती करण्यासाठी विशेष जागा

अपघात झाल्यास त्वरित उपचारासाठी वैद्यकीय केंद्र

शर्यतीच्या सुरक्षिततेसाठी मजबूत लोखंडी कुंपण व बॅरिअर

प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था, अन्न-पाणी, प्रसाधनगृहे

वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस व प्रशासनाची मदत

रस्ते बंद केल्यामुळे निर्माण होणारी गर्दी टाळण्यासाठी नियोजन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud: टीप मिळाली अन् आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा पर्दाफाश झाला! 1000 कोटींच्या सायबर घोटाळ्याचं 'चीन कनेक्शन'; 4 चिनी नागरिकांसह 17 जणांवर गुन्हा दाखल

Viral Video: अक्षय खन्नावर पाकिस्तान फिदा! 'FA9LA' हुकस्टेपचा बलुची पोरांना फीव्हर; फॅनबेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क

VIDEO: चालत्या कारला केलं लक्ष्य, बॉम्ब थेट गाडीवर आदळला, 7 ऑक्टोबरच्या नरसंहाराचा मास्टरमाईंड 'राद साद' ठार; इस्रायली सैन्याने हवाई हल्ल्यात घेतला बदला

'गोव्यात हफ्ता दिल्याशिवाय धंदा चालत नाही', रोमिओ लेन दुर्घटनेवरून केजरीवालांचा भाजप सरकारवर हल्ला

IND vs SA: अभिषेक शर्मा बनणार टीम इंडियाचा नवा 'रन मशीन'! किंग कोहलीचा 9 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड धोक्यात; कराव्या लागणार 'इतक्या' धावा

SCROLL FOR NEXT