Joseph Pinto Dainik Gomantak
गोवा

Joseph Pinto : गोमंतक टाईम्सचे माजी निवासी संपादक जोसेफ पिंटो यांचे पुण्यात निधन

पिंटो यांनी असंख्य नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन केले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Senior journalist Joseph Pinto passed away : पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि गोमंतक टाइम्सचे माजी निवासी संपादक जोसेफ उर्फ जो मेलव्हिल पिंटो यांचे शनिवारी (29 जुलै) सकाळी आजाराने पुण्यात निधन झाले. ते 73 वर्षांचे होते.

बुधवारी त्यांना ह्रदय विकाराचा झटका आल्याने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी कल्पना, कन्या पल्लवी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. शनिवारीच त्यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.

पिंटो यांनी जून 2003 ते जुलै 2004 या काळात गोमातंक टाइम्सचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली वृत्तपत्राने नवीन उंची गाठली आणि वाचकांशी घट्ट नाते जोडले. गोमंतक टाइम्स मध्ये काम करण्यापूर्वी ते दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड, पुणे येथे एप्रिल १९९६ ते मार्च २००३ पर्यंत सल्लागार म्हणून कार्यरत होते.

पिंटो यांनी मे १९८३ ते मार्च १९९६ या कालावधीत पुणेस्थित इंग्रजी दैनिक महाराष्ट्र हेराल्ड मध्ये काम करत असताना एक चतुरस्त्र पत्रकार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली.

ते महाराष्ट्र हेराल्ड मध्ये उपसंपादक म्हणून रुजू झाले आणि सहाय्यक संपादक पदापर्यंत पोहोचले. काम, समर्पण, भाषेवर प्रभुत्व आणि बातम्यांची चपखल जाणीव ही त्यांची खासियत.

१८८७ पासून शेवटच्या श्वासापर्यंत ते पत्रकारितेत सर्वाधिक काळ सेवा देणार्‍या व्हिजिटिंग फॅकल्टीपैकी एक आहेत. या तीन दशकांमध्ये, त्यांनी पुण्यातील विविध नामांकित माध्यम संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या असंख्य नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन केले आहे, ज्यांनी देशभरातील विविध माध्यम संस्थांमध्ये उच्च पदांवर काम केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT