Suresh Prabhu  Dainik Gomantak
गोवा

'या स्वर्गाचा आनंद घेण्यासाठी मरण्याची गरज नाही'; पाऊस आणि कोकण, माजी मंत्री सुरेश प्रभुंचे ट्विट व्हायरल

पहिला पाऊस आणि निसर्ग याचा संदर्भ देत सुरेश प्रभुंनी कोकणाला स्वर्गाची उपमा दिली आहे.

Pramod Yadav

राजापूर मतरदार संघाचे माजी खासदार मात्री केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू सध्या कोकणात असून, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवत आहेत. सुरेश प्रभू यांनी कोकणातून एक फोटो शेअर केला आहे. यात प्रभू लॅपटॉप घेऊन खूर्चीत बसलेले दिसत आहेत. त्यामागे हिरवागार झालेले परिसर आणि माडाची झाडे दिसत आहेत.

पहिला पाऊस आणि निसर्ग याचा संदर्भ देत सुरेश प्रभुंनी कोकणाला स्वर्गाची उपमा दिली आहे.

सुरेश प्रभू यांनी ट्विटमध्ये काय म्हटले आहे?

"माझ्या मूळ गावी कोकणात पावसाच्या पहिल्या सरी कोसळल्या असून, लाल मातीचा सुंगध आणि सोबत पत्नीने केलेला गरमागरम मसालेदार चहा यांचा आस्वाद घेत आहे. पावसामुळे केवळ उष्णतेपासून दिलासाच दिला नाही तर निसर्गालाही अप्रतिम सौंदर्य बहाल केले आहे. मुसळधार पावसात नारळाची झाडे आनंदाने डोलतात, पक्ष्यांचा लपंडाव सुरू होतो. शेतकरी भातशेती पाहतात आणि त्यांच्या भावना जागृत होतात. पृथ्वीवरील या स्वर्गाचा आनंद घेण्यासाठी मरण्याची गरज नाही!"

राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर सुरेश प्रभू यांनी सोशल मिडियावर शेअर केलेला फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. कोकणाचे प्रभू यांनी केलेले वर्णन अनेकांना पसंद पडले आहे. लोकांनी प्रभू यांच्या साधेपणाचे कौतुक केले आहे. तसेच, कोकणाच्या वर्णनाची दाद दिली.

प्रभू यांच्या पत्नी उमा प्रभू यांनी देखील या ट्विटला दाद देत आशा आहे की तुम्हाला चहा आवडला असेल! अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सुरेश प्रभूंचा राजकीय प्रवास

राजापूर मतदारसंघातून 1996 साली सुरेश प्रभू पहिल्यांदा खासदार झाले. 1996 साली सुरेश प्रभू केंद्रीय उद्योगमंत्री झाले, 1998 साली पर्यावरणमंत्री झाले आणि नंतर 1999 साली ऊर्जामंत्री झाले. 2014 ते 2019 या मोदी सरकारच्या पहिल्या पाच वर्षांत पहिले तीन वर्षे (2014 ते 2017) रेल्वेमंत्री, नंतर वाणिज्य आणि नागरी विमान वाहतूक अशी मंत्रिपदं त्यांनी सांभाळली.

26 वर्षांच्या राजकीय आयुष्यानंतर 2 फेब्रुवारी 2022 रोजी सुरेश प्रभू यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: 'तुम हारने लायक ही हो...' आफ्रिकेविरूध्द टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, दिग्गज खेळाडूची पोस्ट व्हायरल

'IFFI 2025' मध्ये गोव्यातील 2 चित्रपटांना संधी! मिरामार, वागातोर किनाऱ्यांसह मडगावच्या रविंद्र भवनात 'Open-air Screening' ची मेजवानी

Goa Police: 5000 पेक्षा अधिक कॉल, 581 तक्रारींवर तत्काळ कार्यवाही; सायबर गुन्ह्यांना 100% प्रतिसाद देणारं 'गोवा पोलीस' दल देशात अव्वल

आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचा डंका! वास्कोच्या मेघनाथने दुबईत जिंकली 2 रौप्य पदके; मेन्स फिटनेस स्पर्धेत वाढवला देशाचा मान

Viral Video: नवी कोरी थार काही दिवसांत बंद पडली; मालकाने गाढवं बांधून, ताशा वाजवत कार शोरुमला ओढत नेली, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT