Nilesh Cabral Dainik Gomantak
गोवा

Curchorem Constituency: कुडचडेला आदर्श मतदारसंघ बनवणे हेच स्‍वप्‍न; आमदार निलेश काब्राल

Curchorem MLA Nilesh Cabral: कुडचडेचे आमदार तथा माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा केला.

गोमन्तक डिजिटल टीम

कुडचडेचे आमदार तथा माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. सकाळी ९ वाजता काब्राल यांनी चेतना विद्यालयात जाऊन दिव्यांग मुलांसह केक कापून वाढदिवसाला सुरुवात केली.

यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उपस्थिती लावून त्यांना शुभेच्छा दिल्या. कुडचडेच्‍या लाेकांनी आजवर आपल्‍याला भरभरून प्रेम दिले आहे. कुडचडेचा विकास करून कुडचडे मतदारसंघ गोव्‍यातील आदर्श मतदारसंघ करणे हे माझे स्‍वप्‍न असून हे स्‍वप्‍न पूर्ण करण्‍यासाठी मी माझे सर्वस्‍व देण्‍यासाठी तयार आहे, असे काब्राल यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामू नाईक, दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धार्थ गावस देसाई व इतर मान्यवर उपस्थित होते. नीलेश काब्राल यांचे मंत्रिपद गेले म्हणून कुणीही चिंता करू नये, काब्राल हे भाजपचे कार्यकर्ता असून त्यांना सांभाळून घेण्यास मी समर्थ असल्याचे सावंत यांनी सांगितले.

त्यांनी कुडचडे मतदारसंघात जी विकासकामे सुरू आहेत ती पूर्णत्वास नेण्याची आमची जबाबदारी आहे. भाजप कार्यकर्त्यांनी खचून न जाता काम करावे, असे सावंत यांनी यावेळी सांगितले. काब्राल यांनी महिला सशक्तीकरण कार्यक्रमाचे तसेच कदंब बसस्थानकावरील नव्या सुलभ शौचालयाचे उद्‌घाटन केले.

शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची गर्दी

सकाळी ११ वाजता त्यांनी आपल्या कार्यालयात उपस्थित राहून लोकांच्या शुभेच्छा घेण्यास सुरुवात करताच हजारोंच्या संख्येने त्यांच्या चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रांग लावली होती. सकाळपासून लागलेली रांग रात्री उशिरापर्यंत तशीच होती. यात त्यांचे मतदार, कार्यकर्ते व प्रतिष्ठित मान्यवरांचाही सहभाग होता. त्यांच्या कार्यालयात उभे राहण्यासही जागा नव्हती यावरून काब्राल यांची कुडचडेतील लोकप्रियता अजूनही तशीच कायम असल्याचे चित्र दिसत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drugs Case: पोलिसांच्या सापळ्यात अडकला ड्रग्ज विक्रेता! साडेसहा लाखांचे चरस हस्तगत; झारखंडच्या तरुणास अटक

Rashi Bhavishya 27 October 2024: विवाहाचा विषय मार्गी लागेल,धनलाभ देखील होईल; आजचा दिवस अत्यंत महत्वाचा

Content Creators Fair Goa: लाखो कमवण्याचा फंडा; एम. एस. धोनीने कंटेंट क्रिएटर्संना दिला लाखमोलाचा कानमंत्र

Goa Crime: फुलांच्या विक्रीवरुन हाणामारी, सुरी हल्ल्यात दोघेही जखमी; कोलवाळ-चिखली जंक्शनवरील घटना

Goa Crime: झुआरी पूलावरुन उडी मारुन 22 वर्षीय पोलिस शिपायाने संपवले जीवन; मृतदेहाचा शोध सुरु

SCROLL FOR NEXT