माजी पंतप्रधान राजीव गांधी भारतीय विकासाचे शिल्पकार: युरी आलेमाव
माजी पंतप्रधान राजीव गांधी भारतीय विकासाचे शिल्पकार: युरी आलेमाव Dainik Gomantak
गोवा

माजी पंतप्रधान राजीव गांधी भारतीय विकासाचे शिल्पकार: युरी आलेमाव

दैनिक गोमन्तक

कुकळली: दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधींनी माहिती तंत्रज्ञानाच्या नवीन तांत्रिक युगाला अनुसरून अमिट पाऊलखुणा सोडल्या आहेत. त्यांच्या सक्रिय राजकारणात प्रवेशाने भारतातील शिक्षण आणि मानव संसाधन विकासास गुणात्मक वळण मिळू शकले व राजीवजींनी पुढाकार घेतलेल्या अनेक उपक्रमांमुळे खऱ्या अर्थाने भारतात उदारीकरणाच्या दिशेने वाटचाल झाली व त्यांनी आर्थिक सुधारणाची निव घातली असे काँग्रेस नेते युरी आलेमाव यांनी कुकळली गट कॉग्रेस समितीने राजीव गांधींच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितले.

विमान उड्डाण करण्याची आवड असलेल्या व्यावसायिक पायलटने राजकारणापासून अलिप्त राहणे पसंत केले होते परंतु नियतीने त्याला भाऊ संजयच्या अचानक आणि दुःखद मृत्यूनंतर ते राजकारणात खेचले गेले. काँग्रेस पक्षाचा प्रचार करत असताना राजीव गांधी यांची आत्मघाती बॉम्बरने हत्या करण्यात आली त्यांच्या जयंतीनिमित्त, आपण राजीव गांधींच्या भारतातील नाविन्यपूर्ण योगदाना मुळे प्रभावित होऊन काँग्रेस कुटुंबात सामील झाले असल्याचे युरी यावेळी बोलताना म्हणाले. राजीव गांधींनी या देशाला व विशेष करून आपल्या राज्याला दिलेले योगदान आपण विसरू शकत नसल्याचे आलेमाव यांनी यावेळी बोलताना सांगितले.

कुकळली गट अध्यक्ष असिझ नोरोन्हा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. महिला गट अध्यक्ष सोनिया फर्नांडिस, नगराध्यक्ष लक्ष्मण नाईक यांनीही यावेळी राजीव गांधींच्या कार्याची प्रशंसा केली. उपनगराध्यक्ष उपाध्यक्ष अँथनी वाज, नगरसेवक गौरी शेटकर , रायमुंडो डिसूझा, लँड्री मास्करेन्हास, जमीरा पिरिस, उद्धेश देसाई व इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी प्रथम दिवंगत राजीव गांधी यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण केला आणि भारताच्या माजी पंतप्रधानांना पुष्पांजली वाहिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News : अवाजवी शुल्क आकारणाऱ्या शैक्षणिक संस्‍था निशाण्यावर; मुख्‍यमंत्र्यांनी दिला कडक कारवाईचा इशारा

Panaji News : दहावी झाली, आता पुढे काय? स्मार्ट निर्णय घ्या; व्यावसायिक, औद्योगिक संस्थांचे पर्याय

PM Modi Interview: ‘’पाच वर्षे राजकारण करु नये’’: पंतप्रधान मोदींची बेधडक मुलाखत; प्रत्येक प्रश्नांची दिली दिलखुलास उत्तरे

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

SCROLL FOR NEXT