Alex Reginald Lawrence

 

Dainik Gomantak

गोवा

पसंत करा, न करा, मी खरंच बोलणार: रेजिनाल्ड

मी कधीही पैशासाठी किंवा कशासाठीही गेलो नाही आणि जाणार नाही. पण गोव्याच्या हितासाठी जे मी नेहमी माझ्या प्राधान्यक्रमात प्रथम ठेवले आहे, ते यापुढेही राहील, असे उद्‍गार माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी काढले.

दैनिक गोमन्तक

Vasco : माझ्या टिकाकारांनी माझ्या विरोधात खोटा अजेंडा चालवला आहे. जसे की तृणमूलमध्ये सामील होण्यासाठी मी पैसे घेतले आहेत. मी माझ्या फेसबुक समीक्षकांना सांगू इच्छितो की, मी एकही पैसा कमावलेला नाही आणि मी कोणतेही घर खरेदी केलेले नाही. मी एक सामान्य माणूस आहे आणि माझ्या लोकांना हे सर्व सत्य माहित आहे. मी कधी कुटूंबासोबत तारांकित हॉटेलमध्ये जेवण घेतले तो दिवस आठवत नाही. मी टिकाकारांना सांगू इच्छितो, ‘तुम्ही मला पसंत करा न करा, मी खरे बोलेन.’ आमदार या नात्याने मी कधीही धर्म - जात, श्रीमंत - गरीब असा भेदभाव केला नाही. मी नि:स्वार्थ भावनेने काम केले. मी कधीही पैशासाठी किंवा कशासाठीही गेलो नाही आणि जाणार नाही. पण गोव्याच्या हितासाठी जे मी नेहमी माझ्या प्राधान्यक्रमात प्रथम ठेवले आहे, ते यापुढेही राहील, असे उद्‍गार माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी काढले.

अत्यंत संतप्त मनःस्थितीत, भावनांनी भरलेले कुडतरीचे काँग्रेसचे माजी आमदार आणि आता तृणमूल काँग्रेस नेते अॅलेक्सिओ रेजिनाल्ड (Alex Reginald Lawrence) लॉरेन्स यांनी आज (मंगळवारी) दाबोळी विमानतळावर (Dabolim International Airport) रात्री उशिरा आल्यानंतर विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.

काँग्रेसमधील (Congress) राजकीय योगदानावर रेजिनाल्ड म्हणाले, मी कधीच कार्यरत अध्यक्षपद मागितले नाही. पण, त्यांनी मला बनवले. गोवा फॉरवर्ड (Goa Forward Party), मगोशी (MGP) युती करण्याच्या अनेक सूचना मी दिल्या. आम्हाला एकजुटीने भाजपशी लढायचे आहे. मी पक्षाला रोहन खवंटे, मायकल लोबो यांनाही पक्षात घेण्यास सांगून ही संधी सोडू नये. पण, त्यांनी कान बधीर केले. मग मी तृणमूल कॉंग्रेसला (TMC) काहीतरी करताना पाहिले आणि मला दिसले की, टीएमसीला काहीतरी करण्याची इच्छा आहे आणि म्हणून मी टीएमसीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.

लोकांच्या भल्यासाठी आवाज

मी भाजपमध्ये गेलो असतो तर माझ्या मतदारसंघाची सर्व कामे झाली असती. कुडतरीमधून भाजपचा कुठलाच उमेदवार निवडून येऊ शकत नाही. तरीही मी तसा निर्णय घेतला नाही. दिगंबर कामत व गिरीश चोडणकर यांनाच सांगू इच्छितो की, मी स्थिर आणि सातत्यपूर्ण विचारसरणीचा विरोधी आवाज आहे, असे रेजिनाल्ड म्हणाले.

मी पैसे घेतल्याचे सिद्ध करून दाखवा

गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी दहा आमदार बाहेर गेल्यावर पक्षासाठी आपण काय केले याचे उत्तर द्यावे. 17 आमदारांपैकी 2 आमदार कुणामुळे राहिले हे चोडणकर यांनी स्पष्ट करावे. राज्यातील लोकांचे प्रश्नांकडे कॉंग्रेसने लक्ष द्यावे. मी पैसे घेतले आहेत असे जर म्हणत असाल तर ते सिद्ध करून दाखवा, असे आवाहन रेजिनाल्ड यांनी केले.

अन् मजबूत बनलो

रेजिनाल्ड म्हणाले, ‘मी लोकांसाठी माझ्या पद्धतीने काम करत आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मी झेडपीतून आमदार बनलो. प्रत्येक वेळी मी पडलो, उठलो अन् अधिक मजबूत माणूस बनलो. हे सर्व माझ्या कुटुंबामुळे आणि समर्थकांमुळे शक्य झाले, असे रेजिनाल्ड म्हणाले.

काँग्रेसचा दोनवेळा आमदार झालो. परंतु पक्षाने कधी विश्वासात घेतले नाही. तरीही काँग्रेससोबत प्रामाणिक राहिलो. आता कुडतरीवासीयांना न्याय देण्यासाठीच तृणमूलमध्ये प्रवेश केलाय. पैशांसाठी पक्ष सोडायचा असता तर कधीच सोडला असता, असे मत आलेक्‍स रेजिनाल्‍ड लॉरेन्‍स यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

SCROLL FOR NEXT