Former Minister Dilip Parulekar joins BJP Dainik Gomantak/Sandeep Desai
गोवा

Goa BJP: माजी मंत्री दिलीप परुळेकर भाजपासोबतच; प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

परुळेकरांची भाजप गोवा प्रदेश उपाध्यक्षपदी तसेच राज्य निवडणूक समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याची घोषणा सदानंद शेठ तानावडे यांनी केली.

दैनिक गोमन्तक

Goa BJP: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा भारतीय जनता पक्षात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. नुकतेच माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर (Laxmikant Parsekar) यांनी मांद्रे मधून उमेदवारी न मिळाल्याच्या नाराजीतून भाजपला रामराम करून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. पक्षातील अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्याने पक्ष सोडून जाणे हा भाजपसाठी (BJP) एक धक्काच होता. त्यामुळे सध्या सत्तेत असलेला भाजप पक्ष पुन्हा सत्तेवर येण्यासाठी कसोटीचे प्रयत्न करत आहे.

पक्षातर्फे आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे (Sadanand Sheth Tanawade) यांनी पार्सेकरांच्या या निर्णयावर नाराजी दर्शवली. एकीकडे नेते पक्षबदल करत असले तरी पक्षात नव्याने दाखल होण्यासही अनेकजण उत्सुक आहेत, हे या परिषदेतून स्पष्ट झाले आहे. माजी पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर हे पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज होते. पण तरीही ते पक्षासोबतच असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भाजप पक्षाचा इतिहास खूप जुना असून संकटाच्या वेळी पक्षासोबतच असणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आणि हाच सल्ला त्यांनी पार्सेकरांना देखील दिला आहे. परुळेकरांची भाजप गोवा प्रदेश उपाध्यक्षपदी तसेच राज्य निवडणूक समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याची घोषणा सदानंद शेठ तानावडे यांनी केली. ही नियुक्ती गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), सदानंद शेठ तानावडे आणि सी. टी. रवी यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT