Goa Sailors Problems: खलाशांच्‍या समस्‍या सोडविण्‍यासाठी ‘आप’चा पुढाकार

‘आप’चे पक्षाचे बाणावलीतील उमेदवार कॅप्टन व्हेंझी व्हिएगस यांनी बाणावली सीफेरर्स पॅनल आणि एक मोबाईल नंबर जाहीर केला आहे
Aam Adami Party
Aam Adami Party Dainik gomantak
Published on
Updated on

Goa Sailors Problems: गेल्या अनेक दशकांपासून बाणावलीतील खलाशांच्‍या समस्‍या ‘जैसे थे’ आहेत. कोणीही त्‍या सोडविण्‍यासाठी स्‍वारस्‍य दाखविलेले नाही. मात्र आता आम आदमी पक्षाने (AAP) ही समस्‍या सोडविण्‍यासाठी पुढाकार घेतला आहे. या पक्षाचे बाणावलीतील उमेदवार कॅप्टन व्हेंझी व्हिएगस यांनी बाणावली सीफेरर्स पॅनल आणि एक मोबाईल नंबर (9851134134) जाहीर केला आहे, ज्यामुळे या समुदायाच्‍या समस्‍या सोडविणे सोपे होणार आहे. तसेच जाहीरनाम्‍यासाठी त्‍यांच्‍या सूचना मागविणे शक्‍य होणार आहे. (Aap's initiative to solve the problems of sailors)

Aam Adami Party
Goa Congress: काल घेतलेली शपथ आवश्यक होती, कारण... : पी. चिदंबरम

सीफेरर्स मॅनिफेस्टो समितीच्या सदस्यांमध्ये कॅप्टन नॉर्बर्ट रेबेलो, मुख्य अभियंता अर्नेस्टो फर्नांडिस, सेवानिवृत्त सीफेअर कायतान फर्नांडिस, अल्बान रिबेलो आणि इस्माईल फर्नांडिस यांचा समावेश आहे. व्हिएगस म्हणाले की, बाणावलीच्या खलाशांनी कॉल, मेसेज किंवा व्हॉट्सॲप करून जाहीरनाम्यासाठी त्यांची मते नोंदवावीत. सर्व सूचना जाहीरनाम्यात समाविष्ट केल्या जातील आणि पुढील पाच वर्षांत त्यांची अंमलबजावणी केली जाईल.

कॅप्टन नॉर्बर्ट रिबेलो म्हणाले की, खलाशी (Sailor) देशाला भरपूर महसूल मिळवून देतात. परंतु ते निवृत्त झाल्यावर विस्‍मृतीत जातात. कॅप्टन व्‍हेंझी हे बाणावलीसाठी चांगले उमेदवार आहेत. कारण त्यांना येथील लोकांच्‍या समस्‍यांची जाणीव आहे.

Aam Adami Party
Goa Elections 2022: फ्रान्सिस्को सिल्वेरा मतदारांना धमकावत आहेत: रामराव वाघ

अनेकदा मागण्‍या, विनंत्या करूनही भाजप (BJP) सरकार खलाशांच्‍या निवृत्तिवेतनाचा प्रश्‍‍न सोडवू शकले नाहीत. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारने याआधी नाविकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पेन्शन वाढवली होती. मात्र, 2019 पासून ही पेन्शन बंद करण्यात आली आहे. त्‍यामुळे खलाशांना त्रास सहन करावा लागत आहे. आता आम आदमी पक्ष या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करेल असा आम्‍हांला विश्‍‍वास वाटतोय.

- कायतान फर्नांडिस, सेवानिवृत्त खलाशी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com