Former Mayor of Margao Nandadeep Raut joins Congress dainik gomantak
गोवा

मुरगावचे माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांचा सपत्नीक काँग्रेसमध्ये प्रवेश

प्रिया राऊत यांच्या प्रवेशामुळे मुरगाव पालिका मंडळातील काँग्रेसची सदस्य संख्या दोनवरून तीनवर

दैनिक गोमन्तक

दाबोळी: नंदादीप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा योग्यवेळी निर्णय घेतला असून काँग्रेसची (Congress) ताकद वाढल्याने यावेळेस वास्को (Vasco) मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा पुन्हा लागणार. वास्कोतील जनता येत्या निवडणुकीत (Goa Election) काँग्रेसलाच पाठिंबा देईल, असा विश्वास व्यक्त करुन भाजपाला (BJP) पराभूत करण्यासाठी एकजूट ठेवण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी वास्को येथे व्यक्त केला.

मुरगावचे माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत व त्यांची पत्नी नगरसेविका प्रिया राऊत यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.तसेच प्रिया राऊत यांच्या प्रवेशामुळे मुरगाव पालिका मंडळातील काँग्रेसची सदस्य संख्या दोनवरून तीनवर गेली आहे.

येथील एमपीटी इन्स्टिट्यूट सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात यावेळी व्यासपीठावर काँग्रेस नेता आमदार दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष नझीर खान, महिला काँग्रेस अध्यक्ष बीना नाईक, गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, वास्को काँग्रेस गटाध्यक्ष उलारीको रॉड्रिग्स, माजी नगराध्यक्ष नितीन चोपडेकर, माजी नगरसेवक सैफुल्ला खान, एम. के. शेख, नियाजी शेख, उदय मडकईकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कामत म्हणाले, मागील दहा वर्षांत वास्को शहराचा काहीच विकास झालेला नसून उलट वास्कोची जनता कोळसा प्रदूषणामुळे बरीच त्रस्त झालेली आहे. या प्रदूषणामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहोत. काँग्रेस सरकार स्थापित झाल्यास राज्याला कोळशाचे केंद्र बनू देणार नसल्याचे आश्वासन पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी दिल्याची माहिती कामत यांनी उपस्थितांना दिली. निवडणुकाजवळ आल्याने दिल्ली आणि पश्चिम बंगालमधून काही पक्ष गोव्यात आले असून येथील जनतेने अशा पक्षांच्या मागे न लागता काँग्रेस पक्षाबरोबर राहण्याची गरज आहे, असेही कामत म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी यावेळी बोलतांना भाजपने गोव्यातील जनतेची थट्टा चालवली आहे.अशा पक्षाला हद्दपार करूया.काॅग्रेस पक्षात नवीन नवीन चेहरे आले आहेत.त्यांच्यात ही ताकद आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना नंदादीप राऊत म्हणाले, गेल्या दहा वर्षांत वास्कोत विकास झाला नसल्याने मी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस पक्षच वास्कोचा विकास करण्यासाठी सक्षम पक्ष असून भविष्यात नक्कीच उत्तम विकास होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सैफुल्ला खान यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला वास्को मतदारसंघातून पराभव का पत्करावा लागला यासंबंधी माहिती दिली.

यावेळी नंदादीप राऊत यांनी सुरू केलेल्या 'हेल्पलाइन'चे अनावरण करण्यात आले. हेल्पलाइन 24 तास सुरू राहणार असून गरजूंना वाहनाने इस्पितळात नेण्यासाठी सहकार्य करणार आहे. तसेच वास्कोच्या शहराच्या विकासासाठी काही सूचना, सल्ले असल्यास येथे देता येणार आहेत. सुरुवातीला.सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. उलारिको रॉड्रिग्ज यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT