arrested Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: माजी पर्यटनमंत्री मिकींना 13 लाखांचा गंडा, नाहक बदनामीचा दावा; एकाला अटक

Micky Pacheco: दरम्यान, पाशेको यांनी शनिवारी मडगावात पत्रकार परिषद घेऊन, सध्या फिडोल व तिचे अन्य काही सहकारी आपल्या विरोधात अकारण गरळ ओकत असल्याचा आरोप केला.

Sameer Panditrao

मडगाव: आर्थिक व्यवहारातून माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांना १३ लाखांचा गंडा घातल्याच्या आरोपाखाली कोलवा पोलिसांनी फिडोल परेरा हिला अटक केली आहे. तर तिचा अन्य एक सहकारी क्लाव कार्दोज याचा सध्या शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, पाशेको यांनी शनिवारी मडगावात पत्रकार परिषद घेऊन, सध्या फिडोल  व  तिचे अन्य काही सहकारी आपल्या विरोधात अकारण गरळ ओकत असल्याचा आरोप केला. फिडोल  व यूटूबर्स  चॅनेल अलर्ट  गोवन्स हे आपली नाहक बदनामी करत असून आपण याबाबत कोलवा पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केल्याचे सांगितले. 

मी तिच्याकडून  रक्कम घेतली होती. माझी सर्व बँक खाती २०१० साली गोठविण्यात आली होती. जी रक्कम मी घेतली ती परत केली, असे पाशेको म्हणाले. फसवणुकीची ही घटना  यावर्षी जून व जुलैदरम्यान  घटना घडली  होती.

कोलवा पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले होते. कोलवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या फिडोल अटकेत असून, पुढील तपास सुरू आहे.

फिडोलची प्रकृती बिघडली!

फिडोलची प्रकृती बिघडल्याने तिला इस्पितळात दाखल केले आहे. तिला तेथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती कोलवा पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT