Laxmikant Parsekar Dainik Gomantak
गोवा

घरवापसी करण्यास तयार! माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर 'भाजप'कडून प्रस्तावाच्या प्रतीक्षेत

Goa Politics: मनोहर पर्रीकरांना दिल्लीत संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर २०१४ मध्ये गोवा मुख्यमंत्रीपदी पार्सेकरांची वर्णी लागली होती.

Pramod Yadav

पणजी: राज्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी भाजपमध्ये घरवापसी करण्यास तयारी दर्शवली आहे. यापूर्वीही त्यांनी पक्षप्रवेशासाठी तयार असल्याचे भाष्य केले होते. दरम्यान, यावेळी त्यांनी पक्षाकडून प्रस्तावाची अट ठेवली आहे. प्रस्ताव आल्यास प्रवेश करण्यास तयार आहे, असे स्पष्ट भूमिका त्यांनी सोमवारी (१५ सप्टेंबर) मांडली.

लक्ष्मीकांत पार्सेकरांनी २०२२ मध्ये भाजपचा राजीनामा देऊन, मांद्रेतून अपक्ष निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना पराभव पत्कारावा लागला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेशाची इच्छा बोलून दाखवली होती.

त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी स्पष्ट भाष्य करताना प्रस्ताव आल्यास प्रवेशास तयार असल्याचे सांगितले. आता भाजप पार्सेकरांना केव्हा प्रस्ताव पाठवणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दिवंगत मनोहर पर्रीकरांना दिल्लीत संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर २०१४ मध्ये गोवा मुख्यमंत्रीपदी पार्सेकरांची वर्णी लागली होती. दरम्यान, २०१७ मध्ये दयानंद सोपटे यांनी मांद्रे मतदारसंघातून त्यांचा पराभव केला.

२०२२ मध्ये सोपटेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पार्सेकरांनी भाजपला रामराम ठोकला होता. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढणाऱ्या पार्सेकरांसह दयानंद सोपटे यांचाही पराभव झाला होता.

२०२७ रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी दयानंद सोपटे यांच्यासह दयानंद पार्सेकर देखील इच्छुक आहेत. त्यामुळे भाजप तिकीट नाकारल्यामुळे पक्ष सोडलेल्या पार्सेकरांना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, सध्या मांद्रेत मगोचे जीत आरोलकर आमदार आहे.

मगो भाजपसोबत सत्तेत आहे, त्यामुळे २०२७ च्या निवडणुकीत मांद्रेच्या तिकीटाचा मुद्दा जटील होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है... Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान आणखी दोनवेळा भिडणार, संपूर्ण 'गणित' समजून घ्या

गोव्यात दोन दिवस धुमाकूळ घालणारा 'ओंकार' अखेर महाराष्ट्रात दाखल; फटाके, बॉम्बच्या आवाजाने दणाणले जंगल

Gold Rate: सोन्याचे दर गगनाल भिडले! सणासुदीच्या काळात खरेदीला ब्रेक; मागणी तब्बल 'इतक्या' टक्क्यांनी घटण्याचा अंदाज

Margao: देवपूजेची फुले विसर्जनासाठी गेला अन् पाय घसरुन नदीत बुडाला; एक दिवसानंतर सापडला मृतदेह

Goa Live Updates: नीता कांदोळकर यांनी दिला सांगोल्डा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा राजीनामा!

SCROLL FOR NEXT