MP Francisco Sardinha & Rahul Gandhi Dainik Gomantak
गोवा

Francisco Sardinha: राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा थांबवावी; काँग्रेस खासदार सार्दिन असं का म्हणाले?

Bharat Jodo Yatra: काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आज (सोमवारी) मतदान होत आहे.

दैनिक गोमन्तक

Francisco Sardinha's Statement: काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आज (सोमवारी) मतदान होत आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेबाबत काँग्रेस नेत्यांचे एकमत नाही. काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री फ्रान्सिस्को सार्दिन यांनी राहुल गांधींविरोधात आघाडी उघडली आहे. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा थांबवावी आणि गुजरात आणि हिमाचल प्रदेशात जिथे निवडणुका होणार आहेत, तिथे जाऊन पक्षाचा प्रचार करावा, असे फ्रान्सिस्को सार्दिन म्हणाले.

फ्रान्सिस्को सार्दिन यांनी ही गोष्ट सांगितली

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस्को सार्दिन (MP Francisco Sardinha) म्हणाले की, 'राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा थांबवावी आणि हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये जाऊन लोकांना जागृत करावे, जेणेकरुन ते भाजपचा पराभव करणाऱ्या एकमेव पक्षाला मतदान करु शकतील. भाजपला (BJP) विरोध करणारा काँग्रेस (Congress) हा एकमेव पक्ष आहे.'

भारत जोडो यात्रेचा आज 40 वा दिवस आहे

राहुल गांधी (Rahul Gandhi) आज कर्नाटकातील बेल्लारी येथे आहेत. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा आज 40 वा दिवस आहे. कन्याकुमारीपासून सुरु झालेली भारत जोडो यात्रा काश्मीरपर्यंत जाणार आहे. भारत जोडो यात्रेने राहुल गांधी नुकतेच कर्नाटकात पोहोचले आहेत. तर दुसरीकडे, आगामी काळात हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये निवडणुका होणार आहेत. याबाबत गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

गुजरात-हिमाचलमध्ये राहुल गांधींची गरज आहे

विशेष म्हणजे, काँग्रेसचे दिग्गज नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री फ्रान्सिस्को सार्दिन यांचा विश्वास आहे की, राहुल गांधींनी आपली भारत जोडो यात्रा सोडल्यास आणि हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये लोकांमध्ये प्रचार केला तर त्याचा पक्षाला फायदा होईल.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री फ्रान्सिस्को सार्दिन शेवटी म्हणाले की, हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये निवडणुका होणार आहेत. विशेष म्हणजे, गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला टक्कर देणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

SCROLL FOR NEXT