गोवा

CM Manohar Parrikar : सातव्या वेतन आयोगापासून ‘कदंब’ वंचित

१४ रोजी आंदोलन ः २०१८ पासूनची थकबाकी त्वरित द्या

गोमन्तक डिजिटल टीम

दरवर्षी १०० ते १५० कर्मचारी सेवानिवृत्त होतात, त्यांच्या जागेवर त्यांना घ्यावे. बदली कामगार म्हणून सेवा करणाऱ्यांना समान वेतन द्यावे. त्याशिवाय रोजंदारीवरील काम करणाऱ्यांच्या वेतनात वाढ करावी, मजूर खाते कमीत कमी वेतनाचा प्रश्‍न निकाली काढत नाही, ते खाते झोपले आहे. सध्याचे सरकार हे कामगारविरोधी आहे. आम्हांला आपल्या हक्कासाठी लढा द्यावा लागेल, असे फोन्सेका म्हणाले.

‘आयटक’चे नेते ख्रिस्तोफर फोन्सेको यांनी यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड झाली. काही ठरावही मंजूर झाले. परंतु महत्त्वाची बाब म्हणजे कदंब कर्मचाऱ्यांना अद्यापि सातवा वेतन आयोग लागू झालेला नाही. मनोहर पर्रीकर यांनी सातवा वेतन आयोग लागू केला.

त्यावेळी कर्मचाऱ्यांनी त्या सरकारचा जयजयकार केला. पर्रीकर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्रिपदी आलेल्या डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी आम्ही सातवा वेतन आयोग लागू करण्याविषयी बैठक घेतली. २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करावा आणि ३० महिन्यांचे थकीत मिळावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी कदंब महामंडळाचे तत्कालीन चेअरमन व मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली, त्यावेळीही आम्हांला अपेक्षा होती पण ती पूर्तता झाली नाही.

आयटकने आत्तापर्यंत कर्मचाऱ्यांना चार वेतन आयोग लागू करून घेतले आहेत, असे सांगून फोन्सेका म्हणाले, कदंब महामंडळ ज्या इलेक्ट्रिक बसेस घेत आहे, त्यावर चालक बाहेरील आहे आणि तिकीट देणारे कदंबचे आहेत. जे बदली कामगार म्हणून काम करतात त्यांना सेवेत कायम करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT