Goa Shipyard Limited Dainik Gomantak
गोवा

1.92 कोटींची बेहिशोबी मालमत्ता; गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या महाव्यवस्थापकाविरोधात CBI कडून गुन्हा

महाव्यवस्थापक मनोरंजन खुंटिया यांच्याविरोधात 22 सप्टेंबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

Pramod Yadav

Goa Shipyard Limited former chief general manager disproportionate assets

बेहिशोबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) या जहाज बांधणी कंपनीच्या माजी मुख्य महाव्यवस्थापकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या गोव्यातील भ्रष्टाचारविरोधी शाखेने एफआयआर दाखल केला आहे. महाव्यवस्थापकावर 1.92 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे.

महाव्यवस्थापक मनोरंजन खुंटिया यांच्याविरोधात 22 सप्टेंबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. खुंटिया 1995 साली जीएसएलमध्ये रुजू झाले आणि 31 मे 2023 रोजी मुख्य महाव्यवस्थापक (एचआर आणि प्रशासक) म्हणून निवृत्त झाले.

1 जानेवारी 2018 ते 30 एप्रिल 2023 दरम्यान जीएसएल, गोवा येथे कार्यरत असताना, खुंटियाने बेकायदेशीररित्या आर्थिक फायदा मिळवला आणि स्थावर व जंगम दोन्ही मालमत्ता जमवली, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

खुंटिया यांच्याकडे 1.92 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता असून, ती त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या 66 टक्के आहे. खुंटिया याबाबत हिशेब देऊ शकले नाहीत, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

एफआयआरनुसार, खुंटिया यांनी कथितरित्या विकत घेतलेल्या मालमत्तेमध्ये ओडिशातील निवासी घर, 2018-19 मध्ये दाबोळी, गोवा येथे 370 चौरस मीटर भूखंडाची खरेदी आणि दाबोळी येथील भूखंडावर निवासी घर बांधणे यांचा समावेश आहे.

खुंटिया विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 13 (2) सह 13 (1) (ई) आणि कलम 13 (2) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 13 (1) (ब) नुसार आरोप ठेवण्यात आले आहेत.

खुंटिया सध्या ओडिशात असून, माझ्याविरुद्ध एफआयआर दाखल झाल्याची मला माहिती असल्याचे त्यांनी इंडियन एक्सप्रेला माहिती दिलीय. गोव्यात परत आल्यावर सर्व व्यवहार आणि प्रश्नांचे स्पष्टीकरण देईन, असेही त्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT