dcholi 6.jpg 
गोवा

डिचोलीत "त्या" वटवृक्षाचा अखेर विसर..!

गोमंन्तक वृत्तसेवा

डिचोली: डिचोलीत (Dicholi) सगळीकडे वटपौर्णिमेचा उत्साह संचारला असतानाच, डिचोलीतील "त्या" वटवृक्षाचा मात्र यंदा सर्वांना विसर पडला. या पुरातन वडाच्या झाडाच्या नशिबी पुन्हा दुर्भाग्य आले आहे. शहरातील पुलाजवळून औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूने दिमाखात उभा असलेला जुनाट वटवृक्ष वटपौर्णिमेच्या दिवशी दुर्लक्षित राहिला. 2019 मध्ये पालिकेच्या पुढाकारातून स्वच्छतादूतांनी या वटवृक्षाची अस्वच्छता आणि दुर्गंधीच्या विळख्यातून सुटका केल्यानंतर,  त्यावर्षी प्रथमच या वडाजवळ वटपौर्णिमा साजरी करण्यात आली होती. काही सुवासिनींनी वडाची पूजा करून वडाभोवती धागा गुंफीत फेरेही घातले होते. त्यामुळे या वटवृक्षाचे भाग्य उजळल्याची जाणीव झाली होती. 

Goa : पारंपारिक पाण्याच्या स्रोतांचे संवर्धन आवश्यक

गेल्यावर्षी जागतिक पर्यावरण दिनीच (World Environment Day) वटपौर्णिमेचा दिवस होता. नाही म्हटले, तरी मागील वर्षीही अपेक्षेप्रमाणे या वडाजवळ वटपौर्णिमा साजरी करण्यात आली नव्हती. मात्र पर्यावरण दिनाचे औचित्य साधून डिचोली पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी या वटवृक्षाला पुष्पहार घातला होता. एवढेच काय ते भाग्य या वडाच्या नशिबी आले होते.  (Forget about that banyan tree in Bicholim)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jijabai Karandak: गोव्याच्या महिला संघाचा सलग 3 रा पराभव! तमिळनाडूविरुद्ध हाराकिरी; स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

Human Wildlife Coexistence: 'ओंकार'ला गोवा महाराष्ट्र पळवलं, यात त्या हत्तीची काय चूक?वन्यजीव असतील तरच मानव टिकेल..

Atal Setu: अंधार, संशयास्पद हालचाली; अटल सेतूखाली नेमके चालते काय? म्हापसा चोरीतले वाहन सापडल्याने विषय ऐरणीवर..

अग्रलेख: रामा काणकोणकर यांना भररस्त्यात मारहाण, सशस्त्र दरोड्यांचे सत्र; यालाच अराजक म्हणतात

Goa Congress: अमित पाटकरांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष? दिल्लीत गोव्यातील सर्व काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक

SCROLL FOR NEXT