Goa Land Grab cases Dainik Gomantak
गोवा

पोर्तुगीज भाषेत बनावट कागदपत्रं, सरकारी बाबूंचा वरदहस्त; गोव्यात जमीन हडप करणाऱ्या टोळीची Modus Operandi

SIT च्या तपासातून समोर आली बाब

Akshay Nirmale

Goa Land Grab Issue: गोव्यातील जमीन हडप करण्याची विविध प्रकरणे विविध ठिकाणांहून समोर आली आहेत. या सर्व प्रकरणांचा तपास एसआयटीकडून केला जात आहे. दरम्यान, भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याशिवाय जमीन हडप करणे अशक्य असल्याचे SIT च्या तपासातून समोर आले आहे.

याशिवाय पोर्तुगीज भाषेतील बनावट कागदपत्रांचा वापर केला जमीन हडपण्यासाठी केला जात आहे. एसआयटीच्या तपासातून या जमीन हडप करणाऱ्या टोळीची ही संपुर्ण मोडस ऑपरेंडीच समोर आली आहे.

सहकारी वाहनचालकापासून ते उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा या जमिनी लाटण्यात सहभाग आहे. अभिलेखागार विभागाच्या नोंदींमध्ये बनावट विक्री करार नोंदवून जमीन बळकावली जात आहे. एसआयटीने जमीन हडपल्याच्या शेकडो तक्रारींची चौकशी करून ही भ्रष्ट साखळी उघड केली आहे.

या प्रकरणांच्या तपासासाठी ऑगस्ट 2022 मध्ये एसआयटीची स्थापन केली गेली. एसआयटीकडे 700 हून अधिक जमिनी हडपल्याच्या 450 हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे सरकारी जमीनीही बळकावल्याच्या घटना घडल्या आहेत. 450 पैकी 44 तक्रारींची संध्या चौकशी आयोगाकडे सुनावणी सुरू आहे.

एसआयटीने प्रतिज्ञापत्रात जमीन हडपण्याची मोडस ऑपरेंडीचा खुलासा केला आहे. त्यात म्हटले आहे की, सुरुवातीला आरोपींनी फर्नांडिस, रॉड्रिग्स, डिसोझा अशा नावांच्या व्यक्तींच्या नावे जमीन हस्तांतरित केली.

त्यानंतर आरोपींनी उपनिबंधक कार्यालयासमोर कौटुंबिक तपशील दडपून त्यांच्या कौटुंबिक वारसाहक्काची नोंद करण्यात यश मिळवले आणि नंतर मालमत्ता खऱ्या संभाव्य खरेदीदारांना हस्तांतरित केली. पोर्तुगीज भाषेत बनावट कागदपत्रे तयार केली, त्यात ख्रिश्चन आडनावांवर विक्री केल्याचे दर्शवले गेले. ते सर्व आरोपींचे नातेवाईक म्हणून दाखवले गेले.

त्यानंतर, पुराभिलेख कर्मचार्‍यांच्या मदतीने नोंदीमध्ये विक्रीचे हे बनावट कागदपत्र टाकली गेली. त्याचा दस्तऐवज बनवला गेला. विभागाने तो प्रमाणित केला आणि तेच इंग्रजीत अनुवादित केले. यानंतर आरोपी इंग्रजी प्रत जोडून मामलेदार कार्यालयात फेरफारसाठी अर्ज करायचे.

जमीन हडप प्रकरणात पुराभिलेख खात्याच्या ३, उपनिबंधक १, मामलेदार १, मामलेदार कार्यालयातील चालक १ अशा ६ सरकारी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

निवृत्त न्यायमूर्ती व्ही. के. जाधव हे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग या प्रकरणांची चौकशी करत आहेत. आयोगाला चार महिन्यात अहवाल सरकारला सादर करावा लागणार आहे.

दृष्टिक्षेपात मोडस ऑपरेंडी

  • बनावट कागदपत्र तयार करण्यासाठी जागा निश्चित्त करणे

  • प्रत्यक्ष मालकांचे खोटे जन्मदाखले, मृत्यूदाखले तयार करणे

  • या बनावट कागदपत्रांआधारे वारसाखत तयार करणे

  • उपनिबंधकांना वारसादार असल्याचे भासवणे

  • वारसाखताच्या आधारे जमीन बळकावून विक्री करणे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT