Omkar elephant relocation Goa Dainik Gomantak
गोवा

Omkar Elephant: "ओंकारला वनतारात पाठवणार नाही", हत्तीच्या स्थलांतरावरून वनमंत्री राणेंची स्पष्ट भूमिका

Omkar elephant relocation: वनमंत्री विश्वजित राणे यांनी ओंकार हत्तीला वनताराला हलवण्याचा कोणताही प्रस्ताव गोवा सरकारसमोर नसल्याचे स्पष्ट केले

Akshata Chhatre

पणजी: गेल्या काही दिवसांपासून गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर असलेल्या ‘ओंकार’ नावाच्या हत्तीच्या स्थलांतरावरून वेगवेगळी माहिती समोर येतेय. महाराष्ट्राचे माजी मंत्री दीपक केसरकर यांनी या हत्तीसह दोडामार्ग तालुक्यातील इतर हत्तींना ‘वनताराला’ हलवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली होती. मात्र, गोव्याचे वनमंत्री विश्वजित राणे यांनी ही शक्यता फेटाळून लावत, असा कोणताही प्रस्ताव गोवा सरकारसमोर नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ओंकारच्या स्थलांतराच्या दिशेवरून विरोधाभास निर्माण झाला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

काही दिवसांपूर्वी दीपक केसरकर यांनी दोडामार्ग येथील हत्तींच्या स्थलांतराची घोषणा केली होती. या घोषणेनुसार, या हत्तींना गुजरातमध्ये नेऊन 'वनतारा' या ठिकाणी ठेवण्याचे प्रयत्न सुरू होते. पण, वनमंत्री विश्वजित राणे यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, ओंकार हत्तीला 'वनतारा' हलवण्याचा कोणताही प्रस्ताव गोवा सरकारसमोर नाही. उलट, कर्नाटक राज्यातील इतर बंदिवान हत्तींच्या मदतीने ओंकारला त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत पाठवण्याबाबत कर्नाटक सरकारशी चर्चा सुरू आहे.

तीन राज्यांमध्ये समन्वय

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापूर्वीच या प्रकरणी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीनही राज्यांमध्ये समन्वय सुरू असल्याची माहिती दिली होती. त्यांनी सांगितले होते की, वन खात्याचे अधिकारी सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. हत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन, त्यांना योग्य ती नुकसानभरपाई दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

वन खात्याच्या पथकांनी संबंधित भागाची पाहणी करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तज्ज्ञांची मदत घेऊन, हत्तीला कोणतीही इजा न पोहोचवता त्याचे जंगलात पुनर्वसन करण्याची तयारी करण्यात येत आहे. दसऱ्यानंतर ही मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे. या तीनही राज्यांमधील समन्वयातून ओंकारला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत पाठवले जाईल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे, दीपक केसरकर यांच्या घोषणेपेक्षा गोव्यातील सरकारची भूमिका वेगळी असल्याचे दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘त्या’ मास्टरमाईंडलाही अटक करा! दक्षिण गोवा भाजपच्या माजी खासदाराची पोस्ट चर्चेत

Cricketer Retirement: क्रिकेटला अलविदा! वकील होण्यासाठी 'या' स्टार खेळाडूनं घेतला निवृत्तीचा निर्णय, क्रीडाविश्वात खळबळ

"अशिक्षित आहात, म्हणूनच तुम्हाला सीमेवर पाठवलं", सैनिकाशी वाद घालणाऱ्या महिलेचा Video Viral; टीकेच्या वादळानंतर मागितली माफी

डिकॉस्ता X गावकर! गोवा विधानसभेच्या सभापतीपदासाठी सत्ताधाऱ्यांकडून गणेश गावकर मैदानात

Sourav Ganguly: 'दादा' पुन्हा अध्यक्षपदी विराजमान, पदभार स्वीकारताच 'T20 World Cup'बाबत केली मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT