dr. vishwajeet rane Dainik Gomantak
गोवा

Vishwajeet Rane: हत्तीपावल येथील उपक्रमांचे वनमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन

वनमंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते खोतीगाव अभयारण्याच्या हत्तीपावल येथील निसर्ग केंद्रातील विविध उपक्रमांचे उद्‌घाटन करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

वनमंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते खोतीगाव अभयारण्याच्या हत्तीपावल येथील निसर्ग केंद्रातील विविध उपक्रमांचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी सभापती रमेश तवडकर, वनविकास महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. दिव्या राणे, मुख्य सचिव डॉ. पुनीत गोयल,

प्रधान वनसंरक्षक राजीव कुमार, वन खात्याच्या वन्यप्राणी विभागाचे प्रमुख वार्डन उमाकांत ए., खोतीगाव अभयारण्याचे प्रमुख क्षेत्रीय वनाधिकारी अनंत वेळीप, पैंगीणच्या सरपंच सविता तवडकर, खोतीगावचे सरपंच आनंदु वेळीप व अन्य वनाधिकारी उपस्थित होते.

यावेळी वनमंत्री व सभापती रमेश तवडकर यांच्या हस्ते हत्तीपावल येथील निसर्ग अभ्यास केंद्राच्या प्रवेशद्वार, ॲक्वेरियम, देवमासा सांगाडा प्रकल्पांचेही उद्‌घाटन करण्यात आले. यापूर्वी वनमंत्र्यांनी नेत्रावळी अभयारण्यातील काही उपक्रमांचे उद्‌घाटनही केले. यावेळी समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई उपस्थित होते.

शेतकऱ्यांना साहित्याचे वितरण

यावेळी मंत्र्यांच्या हस्ते पिकाच्या संरक्षणासाठी पाच शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कार्बाईड गनचे वितरण करण्यात आले. त्याशिवाय वनक्षेत्राला लागलेली आग विझविण्यासाठी विशेष प्रयत्न केलेल्या अग्निशमन केंद्राच्या कर्मचाऱ्यांचा वनमंत्र्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. काही शेतकऱ्यांना मधमाशी पालन पेट्या व मधमाशी पालन साहित्य देण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT