जाणून घ्या Aditya- L1 चा अभ्यास का करायचा?

इस्रोची ही पहिलीच महत्त्वाकांक्षी सौर मोहीम. ‘आदित्य- एल १’ हे अंतराळ यान सूर्य-पृथ्वीच्या प्रणालीतील ‘एल १’ या बिंदूवर (लँगरेंज) प्रभामंडळ कक्षेमध्ये स्थापित केले जाणार आहे.
Aditya- L1
Aditya- L1Dainik Gomantak

Study Of Aditya- L1 : इस्रोची ही पहिलीच महत्त्वाकांक्षी सौर मोहीम. ‘आदित्य- एल १’ हे अंतराळ यान सूर्य-पृथ्वीच्या प्रणालीतील ‘एल १’ या बिंदूवर (लँगरेंज) प्रभामंडळ कक्षेमध्ये स्थापित केले जाणार आहे. हे यान म्हणजे सूर्याचा अभ्यास करणारी अवकाशातील एक प्रकारची वेधशाळाच असणार आहे. हा बिंदू पृथ्वीपासून १५ लाख कि.मी.वर आहे. कोणत्याही अडथळ्याशिवाय किंवा ग्रहणाशिवाय सूर्याचे या बिंदूवरून निरीक्षण करता येईल. ‘एल १’ या बिंदूंच्या कक्षेतून सूर्याचा किंवा सौर घडामोडींचे सातत्याने निरीक्षण करणे, हा या मोहिमेचा हेतू आहे.

अभ्यास का करायचा?

  • पृथ्वीपासून सर्वांत जवळचा तारा असल्याने इतरांच्या तुलनेत अभ्यासाची संधी अधिक

  • या माध्यमातून आकाशगंगेतील ताऱ्यांबरोबरच इतर आकाशगंगांमधील ताऱ्यांचाही अभ्यास

  • आपल्याला दिसणाऱ्या बाबींव्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी घडतात

  • अनेक विस्फोटक स्वरूपाच्या घटना

  • या सौर घटना पृथ्वीचे दिशेने सरकल्यास अंतराळ पर्यावरणात अडथळे शक्य

  • यामुळे विविध अवकाशयान तसेच संप्रेषण प्रणालींना बाधा पोहोचू शकते

  • अशा घटनांची पूर्वसूचना मिळण्यासाठी सूर्याचा अभ्यास महत्त्वाचा

  • एखादा अंतराळवीर अशी काही घटना घडल्यास अडचणीत सापडू शकतो

  • सूर्यावर औष्णिक व चुंबकीय घटना

  • अशा घटना बरेचदा आत्यंतिक स्वरूपाच्या

  • सूर्याचा अभ्यास केल्यास या गोष्टींचे आकलन करणे सोपे

Aditya- L1
Goa Collage: डिचोलीतील कॉलेजजवळ विनानंबरप्लेट दुचाकी!

ही उपकरणे करणार अभ्यास

  • एसओएलइएक्सएस

  • सूर्याच्या सौर लहरींमधून बाहेर पडणाऱ्या ‘हाय एनर्जी एक्स-रे’चा अभ्यास

  • सूर्यातून बाहेर पडणारे एक्स-रे आणि त्यातील बदलांचा अभ्यास

  • सूर्यातून निघणाऱ्या सौर लहरींचाही अभ्यास करणार

  • ही दोन्ही उपकरणे बंगळूरमधील यू.आर.राव उपग्रह केंद्रात तयार झाली

  • व्हीईएलसी

  • (व्हिजिबल एमिशन लाइन कोरोनाग्राफ)

  • ‘आदित्य - एल१’वरील मुख्य उपकरण

  • सूर्याचे प्रभामंडळ आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या प्लाझ्माच्या उद्रेकाचा अभ्यास करणार

  • सूर्याची उच्च प्रतीची छायाचित्रे काढणार

  • बंगळूरमधील भारतीय खगोलभौतिकी संस्थेकडून विकसित

  • पीएपीए

  • (पापा- प्लाझ्मा ॲनलायझर पॅकेज फॉर आदित्य)

  • सूर्याच्‍या गरम हवेतील इलेक्ट्रॉन आणि प्रभावी अणूकणांच्या दिशेचा अभ्यास

  • हवेत किती उष्णता आहे हे, यावरून समजेल

  • तिरुअनंतपुरममधील विक्रम साराभाई अवकाश केंद्राच्या अवकाश भौतिक प्रयोगशाळेत ‘पापा’ची निर्मिती

  • एएसपीईएक्स

  • (अस्पेक्स- आदित्य सोलर विंड पार्टिकल एक्सपिरिमेंट)

  • अन्य उपकरणांपेक्षा वेगळे. यामध्‍ये आणखी दोन उपकरणांचा समावेश

  • सूर्याच्या वातावरणात येणारे अल्फा कण आणि प्रोटॉन्सचा अभ्यास ‘सोलर विंड इयॉन स्पेक्ट्रोमीटर (एसडब्लूआयएस- स्विस) हे उपकरण करणार

  • दुसरे उपकरण ‘सुपल थर्मल अँड एनर्जेटिक पार्टिकल स्पेक्ट्रोमीटर’ (एसटीईपीएस- स्टेप्स) याचे जास्त ऊर्जा देणाऱ्या अणूंच्या समूहाचा अभ्यासाचे उद्दिष्ट

  • अहमदाबाद येथील भौतिक संशोधन प्रयोगशाळेत ‘अस्पेक्स’चा विकास

Aditya- L1
Aditya - L1 मोहीम कशासाठी जाणून घ्या एका क्लिकवर

लॅगरेंज पॉइंट म्हणजे काय?

अवकाशात दोन वस्तुमानांच्या (ग्रह, तारे किंवा मोठ्या उल्का) गुरुत्वीय बलाचा प्रभाव असताना अवकाशातील ज्या बिंदूवर तुलनेने अत्यंत छोटी वस्तू स्थिर राहते, म्हणजेच त्या बिंदूवर असताना त्या वस्तूवर विरुद्ध बाजूंकडून समान गुरुत्वीय बल काम करत असते, अशा बिंदूंना त्या दोन वस्तुमानांच्या संदर्भात ‘लॅगरेंज पॉइंट’ म्हणतात. आदित्य यानही पृथ्वी आणि सूर्य यांच्यादरम्यान असलेल्या अशाच एका बिंदूपर्यंत नेऊन तेथे स्थिर केले जाणार आहे. अशा बिंदूवर कमीत कमी इंधनाचा वापर करून अवकाशयान दीर्घकाळ तेथे थांबू शकते.

एकूण पाच बिंदू

पृथ्वी आणि सूर्य यांच्यादरम्यान एकूण पाच लॅगरेंज पॉइंट आहेत. त्यांना एल १, एल २, एल ३, एल ४ आणि एल ५ असे म्हणतात. एल-१ हा बिंदू आणि पृथ्वी हे अंतर पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील एकूण अंतराच्या केवळ एक टक्का आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com