Fire in Goa Dainik Gomantak
गोवा

Fire in Goa : का लावल्या आगी? असे वागू नका; वनमंत्र्यांची विनंती

संशयितांना शोधण्यासाठी चौकशीस प्रारंभ

अनिल पाटील

Fire in Goa : सध्या म्हादई पाणी वाटपाचा मुद्दा ऐरणीवर असताना म्हादई खोऱ्यात आणि अभयारण्यात मोठ्या प्रमाणात आगी लावल्या आहेत. या आगी का लावल्या ? याबाबत जोरदार चर्चा आहे.

आगी नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहेत असे मत वन विभागाचे आहे. यामागच्या आरोपींना शोधण्यासाठी चौकशी सुरू केल्याचे वनमंत्री विश्‍वजीत राणे यांनी सांगितले असून नागरिकांना असे वागू नका असा सबुरीचा सल्लाही दिला आहे.

म्हादई अभयारण्य हे 1999 साली राखीव जंगल म्हणून अधिसूचित करण्यात आले. आजही या जंगलांमध्ये अनेक गावे अस्तित्वात असून जंगलांमधील जागांवर त्यांचे अतिक्रमण आणि जंगलतोड सुरू आहे. अनेक ठिकाणी वनजमीन ओलिताखाली आणून शेती पिकवली जात आहे. यात नारळ, पोपळी, केळीसह काजू पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते.

सध्या अभयारण्यामध्ये मोठ्या प्रमाणात काजू पिकाचे उत्पादन आणि फेणी गाळप सुरू आहे. यासाठी वन विभागाकडून कोणत्याच प्रकारची आडकाठी आणली जात नसतानाही अशा प्रकारच्या भयंकर आगी का लावल्या जात आहेत? हे मात्र समजत नाही.

एखाद्या मनोविकृत व्यक्तीचे हे काम असावे की यामागे मोठे षडयंत्र आहे याबाबत चौकशी होणे गरजेचे आहे असे मत येथील नागरिकांचे आहे. यावर वनमंत्री विश्वजीत राणे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत

अभयारण्यात लावलेल्या आगी मानवनिर्मितच आहेत. त्या नैसर्गिक नाहीत. कारण नैसर्गिक आग लागण्यासारखी परिस्थिती या जंगलात नाही. येथे बांबूची बने नाहीत. शिवाय आद्रतेचे प्रमाण मोठे आहे आणि पाषाण दगडही नाहीत ज्यामुळे ठिणगीने आग भडकू शकेल. त्यामुळे यामागे एखादी व्यक्ती आहे. हे स्पष्ट आहे.

- अमित गेमावत, सहाय्यक वनसंरक्षक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नोंदणी न केलेले होम स्टे, हॉटेल्सवर कारवाई अटळ! सरकारी महसूल बुडविणाऱ्यांची गय नाहीच, पर्यटनमंत्र्यांचा थेट इशारा

Horoscope 28 Saptember 2026: करिअरला मिळणार गती, वैवाहिक जीवनात गोडवा वाढणार! आज 'या' राशींच्या नक्षत्रात चमकणार यशाचा तारा

History: सदाशिवगड ताम्रपट अन् गोव्यातील कदंब

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

SCROLL FOR NEXT