Mayem Forest Festival Dainik Gomantak
गोवा

Forest Festival : मये महामाया हायस्कूलमध्ये वनमहोत्सव उत्साहात, विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप

तद्नंतर माजी विद्यार्थी संघटनेच्या उपस्थित सदस्यांच्या हस्ते महामाया प्राथमिक व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Mayem : श्री महामाया हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनातर्फे हायस्कूलमध्ये वनमहोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमात माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शंभा पेडणेकर इतर सदस्य अर्जुन नाईक, संदीप मयेकर, शैलेश चोडणकर, अजित सावंत, सुधीर गावस व नितीन गड्डी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला हायस्कूलच्या मुख्याध्यापिका तनुजा गोवेकर यांनी माजी विद्यार्थी संघटनेचे स्वागत केले व त्यांच्या या उत्तम कार्याचे कौतुक केले. तसेच त्या म्हणाल्या, आपण स्वतः वृक्ष लावावेत आणि इतरांना देखील वृक्षलागवड करण्यास प्रेरित करावे.

तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य अर्जुन नाईक यांनी सांगितले, की जंगलाचे रक्षण करणे, जंगलतोड रोखणे मानव हितासाठी किती आवश्यक आहे हे विद्यार्थ्यांना पटवून द्यायला हवे. तद्नंतर माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शंभा पेडणेकर यांनी सांगितले, की निसर्गाचे आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वनांचे रक्षण महत्वाचे आहे.

आपण जंगलतोड रोखायला हवी. गावात विकास व्हावा पण निसर्गाचे नुकसान होऊ नये,याची काळजी भावी पिढीने घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. तद्नंतर माजी विद्यार्थी संघटनेच्या उपस्थित सदस्यांच्या हस्ते महामाया प्राथमिक व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT