Forest Festival  Dainik Gomantak
गोवा

Forest Festival : हेडगेवार विद्यालय दवर्लीतर्फे वनमहोत्सव; जैन मंदिराच्या आवारात वृक्षारोपण

Forest Festival : वन विभागाचे सहकार्य विद्यार्थ्यांसाठी भित्तीपत्रक स्पर्धा

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी, दवर्ली येथे डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालयात वनमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त झरीवाडा-मडगाव येथील जैन मंदिराच्या आवारात इयत्ता सातवीच्या मुलांनी शिक्षकांच्या मदतीने वृक्षारोपण केले.

यावेळी वनविभागाचे अधिकारी महानंद पर्रीकर, गौरीश कलंत्रे उपस्थित होते. महानंद पर्रीकर यांनी मुलांना मानवी जीवनातील झाडांचे महत्त्व पटवून सांगितले तसेच पर्यावरण संरक्षणासाठी जास्तीत जास्त झाडे लावावीत, असेही सांगितले.

यावेळी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात वृक्षारोपण केले. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी फुलांचे हार व मुकुट बनविले. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे महत्त्व सांगणारे नाटक सादर केले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेचा आवार सुशोभित केला.

इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रके तयार केली. तसेच इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी भित्तीपत्रके बनविण्याची स्पर्धा आयोजित केली होती. या भित्तीपत्रकांचे मान्यवरांनी अनावरण केले. याप्रसंगी मुलांनी पर्यावरण गीत सादर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT