Stray Dogs On Goa Beach canava
गोवा

Mobor Beach: मोबोर किनारा पुन्हा चर्चेत! विदेशी महिला पर्यटकावर पाच कुत्र्यांचा हल्ला; सुरक्षा रक्षकांनी वाचवला जीव

Stray Dog Attacks On Tourists: एका विदेशी पर्यटकाला कुत्रा चावल्याने मोबोर समुद्रकिनारा पुन्हा चर्चेत आला आहे. ही घटना मंगळवारी घडली. एकदम पाच कुत्र्यांनी या पर्यटक महिलेवर झडप घालून पायाला चावा घेतला.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: एका विदेशी पर्यटकाला कुत्रा चावल्याने मोबोर समुद्रकिनारा पुन्हा चर्चेत आला आहे. ही घटना मंगळवारी घडली. एकदम पाच कुत्र्यांनी या पर्यटक महिलेवर झडप घालून पायाला चावा घेतला. त्यामुळे तिला १५ इजा झाल्या असून तिचा हात फ्रॅक्चर झाला आहे. ही पर्यटक महिला समुद्र किनाऱ्यावर फेऱ्या मारत होती, तेव्हा कुत्र्यांनी तिला घेरले व पायाला चावा घेतला. तिने मदतीसाठी आपल्या मित्रांना लगेच फोनवरून संपर्क साधला. दरम्यान, जवळ असलेल्या वॉटर स्पोर्ट्स चालक व हॉटेलच्या सुरक्षा रक्षकांनी तिला कुत्र्यांच्या तावडीतून सोडविले.

केळशीचे सरपंच डिक्सन वाझ हे लगेच स्थानिक पंचासह घटनास्थळी पोहोचले. हा समुद्रकिनारा फिरण्यासाठी सुरक्षित नसल्याचे पर्यटकांनी सरपंचांना सुनावले. या महिला पर्यटकाला लगेच इस्पितळात (Hospital) दाखल करण्यात आले. सध्या राज्यातील समुद्र किनारे भटके कुत्रे व गुरांसाठी विशेष चर्चेत आहेत. कुत्र्यांनी चावे घेण्याच्या आजवर अनेक घटना घडल्या आहेत. मात्र यावर परिणामकारक उपाय योजण्यास सरकार अपयशी ठरले आहे.

घटना गंभीर : सरपंच

असा प्रकार आम्ही यापूर्वी कधीच पाहिली नाही. सध्या रस्त्यावर व समुद्र किनाऱ्यांवर भटक्या कुत्र्यांचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागत आहे, असे सरपंच वाझ यांनी सांगितले. यापूर्वी कुत्रा चावल्याच्या घटना अधूनमधून घडत असत, पण आजची घटना गंभीर आहे हे सरपंचानी मान्य केले. केळशी पंचायतीने (Quelossim Panchayat) कुत्रा निवारा केंद्र सुरू केले आहे. मात्र त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरील कुत्र्यांची संख्या कमी होताना दिसत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karapur: ..हा अपघाती मृत्यू नाही, घातपाताचा प्रकार! कारापूर प्रकरणी निघणार 'मशाल मोर्चा'; काय आहे प्रकरण Watch Video

Omkar Elephant: कवाथे-केळी फस्त, वाहनांची तोडफोड! 'ओंकार'चा धुमाकूळ; नागरिकांचा आंदोलन छेडण्याचा इशारा Video

Indigo Flight Status: असुविधा के लिए खेद है! इंडिगोची विमानसेवा विस्कळीतच, गोव्यात 11 उड्डाणे रद्द, कंपनीने मागितली माफी

Goa Politics: खरी कुजबुज; मनोजचा ‘सोशल’ संताप

Super Cup 2025: गतविजेत्या FC गोवाची सुपर कपमध्ये मुसंडी! मुंबई सिटीला नमविले, अंतिम फेरीत पडणार ईस्ट बंगालशी गाठ

SCROLL FOR NEXT