Goa Beach Shacks Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील ‘शॅक’ना विदेशी पर्यटकांची प्रतीक्षा

दैनिक गोमन्तक

पणजी: यंदाचा पर्यटन हंगाम संपत आला तरीही शॅक व्यावसायिक ग्राहकांच्‍या प्रतीक्षेत आहेत. किनाऱ्यावर देशी पर्यटकांची रेलचेल आहे. पण, हे पर्यटक शॅकच्या ठिकाणी येत नसून, ते किनाऱ्यावर येऊनही त्याचा फायदा शॅक व्यावसायिकांना होत नसल्याचे बागा येथील शॅक व्यावसायिक फ्रान्सिस डिसोझा यांनी दै. ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले.

गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे वाया गेले. यंदा पर्यटन हंगाम सुरू झाला पण युरोपमधील वाढता कोरोना आणि युक्रेन - रशिया युद्धामुळे विदेशी पर्यटकांनी गोव्‍याकडे पाठ फिरवली आहे. देशी पर्यटक बऱ्यापैकी आहेत. पण, हे पर्यटक आमच्याकडे येत नसल्याने आमचा व्‍यवसाय अद्याप मंदावलेलाच आहे, असे डिसोझा म्हणाले.

या किनाऱ्यावर येणाऱ्या विदेशी पर्यटकांत रशिया, युक्रेन, उझबेकिस्‍तान, कझागिस्‍तान, ब्रिटन येथील नागरिकांचा अधिक भरणा असतो. या दरम्‍यान युरोपसह रशियात मोठ्या प्रमाणात थंडी असते. यामुळे सूर्यस्‍नानाचा आनंद घेण्यासाठी हे पर्यटक किनाऱ्यांवर येतात. यामुळे नाष्टा, जेवण, मद्य यासह आम्‍ही किनाऱ्यावर लावलेल्‍या बेडमधून आमचा चांगला व्‍यवसाय होतो. सध्या देशी पर्यटक मोठ्या प्रमाणात आहेत. तरीही आमचा व्‍यवसाय होत नसल्‍याचे श्री. डिसोझा म्‍हणाले.

पर्यटनाचे नंदनवदन म्‍हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्‍या आपल्‍या गोव्‍यातील किनारे हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण होय उत्तर गोव्‍यातील सिकेरी, कळंगुट, बागा, आश्‍वे-मांद्रे, मोरजी आणि हरमल किनारे देश-विदेशी पर्यटकांनी फुललेले असतात. सध्या शाळांना उन्‍हाळी सुट्या आहेत. या पार्श्वभूमीवर बहुतांश किनाऱ्यांवर देशी पर्यटकांची मोठी गर्दी दिसून आली. युरोपमधील काही देशात अजून कोरोना पूर्णपणे आटोक्‍यात आलेला नाही. तसेच युक्रेन-रशिया यांच्‍यात सुरू असलेल्‍या युद्धामुळे रशियासह युरोपमधील पर्यटकांनी यंदा गोव्‍याकडे पाठ फिरवली असल्‍याचे दिसून आले. देशी पर्यटकांची रेलचेल मोठ्या प्रमाणात दिसून आली तरीही किनाऱ्यावरील शॅक आणि सूर्यस्‍नानासाठी टाकलेले बेड रिकामेच दिसून आले.

उन्‍हाळ्याच्‍या सुटीत खासकरून महाराष्ट्र, कर्नाटक, मुंबई, गुजरात येथून येणारे देशी पर्यटक थोड्याच दिवसांसाठी गोव्‍यात येतात. बऱ्याचदा सहकुटूंब येत असल्‍याने काही अपवाद वगळता हे पर्यटक फ्लॅट, लॉज किंवा खासगी व्‍हीलमध्ये राहणे पसंद करतात. तर सीमेवरील राज्‍यातून येणाऱ्या पर्यटकांचे खर्चाचे बजेट ठरलेले असते. यामुळे ते खर्च करण्यास धजावत नाहीत, अशी माहिती येथील हॉटेल चालक मनिष झा यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खून प्रकरणातील आरोपीला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांसाठी जामीन, रुमडामळमध्ये तणाव शक्य

Bicholim: पोलिस बंदोबस्तात पिराचीकोंड येथील बेकायदा झोपडपट्टी जमीनदोस्त, परिसरात तणाव

6.80 लाखांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडच्या महिलेला अटक, म्हापशात भेसळयुक्त 200 KG बडीशेप जप्त; गोव्यातील ठळक बातम्या

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

SCROLL FOR NEXT