मोरजी: मोरजी किनारी (Morjim Beach) भागात काही विदेशी व देशी पर्यटक (Tourist) पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येतात. तर काही पर्यटक व्यवसाय उद्योग करण्यासाठी काहीजण संगीत रजनीचा आस्वाद घेण्यासाठी येतात, तर काही पर्यटक मदत करणे, किनारी भागातील कचरा गोळा करून स्वच्छता करणे अशी सेवाही देतात. यातीलच काही पर्यटक आपल्या भावनांचे रंग चित्रात उमटणे, वेगवेगळ्या वस्तू पासून कला निर्माण करणे प्रत्येक वस्तू पासून कलाकुसरी करणे अशीची न्युयार्क येथे स्थायिक झालेली स्नेहा कृष्णन आहे.
स्नेहा कृष्णन यांनी तेंबवाडा मोरजी येथील जार्डीन ड्यूलायसी येथे मुक्काम आहे, 24 रोजी त्याच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन झाले ते शुक्रवार दिनांक 1 पर्यंत सर्वासाठी खुले आहे. या चीत्रप्रदर्शनाचे कोणतेच फॉरमल उद्घाटन झाले नाही. रात्री 8 वाजता हे चित्रप्रदर्शन सुरु झाले. तिला भटंकती करणे आवडते, चित्रप्रदर्शनाची तिने कोणतीच तशी तयारी केली नव्हती ज्या चित्रांचे प्रदर्शन केले त्या ठिकाणी त्या चित्राविषयी संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात ठेवण्यात आली.
24 रोजी प्रदर्शन भरवले त्यावेळी कोरोनाचे नियम पाळून स्नेहा यांनी आपल्या चाहते व हितचींतकाना वेगवेगळ्या वेळेत आमंत्रित केले होते. जेणेकरून गर्दी होणार नाही. नुकतेच वादळी वारे येवून गेल्याने मच्छिमार व्यावासायीकांचे जाळे वाहून गेले होते. त्यात एक जाळी अशीच किनाऱ्यावर पडून होती. त्यावर पावूस पडून ते जाळे स्वच्छ झाले होते. ते तिने आणून एका चांगल्या जाग्यावर ठेवले त्यातून तिने चित्रकृती तयार केली. पाहणाऱ्या वाटेल जणू तो बर्फाचा गोळा आहे.
तिच्या मनातल्या भावनांचे स्थलांतरण प्रत्येक कलाकृतीत दिसत आहे. स्नेहा सांगते आपल्या कलेची सुरुवात बंडखोरीतून झाली आहे. तीने आपली नोकरी सोडूनआता आपले पूर्ण जीवन कलेत घालण्याचा निर्णय घेतला. जार्डीन ड्यूलायसी रेसोर्टचे मालक गिल्बर्ट यांनी प्रतिक्रिया देताना या कलेला लोकप्रियता मिळावी यासाठी आठ दिवस ही जागा प्रदर्शनासाठी मोफत दिलेली आहे. स्नेहा यांची कला साता समुद्रापलीकडे पोचावी आणि या रिसॉर्ट मध्ये देश विदेशातील पर्यटक येतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.