Goa: डिचोली-साखळी रस्त्याची डागडुजी 'स्थगित'

वाहनचालक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. डागडुजीच्या नावाखाली जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा हा प्रकार तर नव्हे ना?
खड्डे रुंदावताहेत, वाहनचालकांत नाराजी.
खड्डे रुंदावताहेत, वाहनचालकांत नाराजी.Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

डिचोली: खड्डेमय बनलेल्या डिचोली-साखळी रस्त्याच्या डागडुजीचे काम अचानक अर्धवट अवस्थेत बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांत (Driver)आश्चर्य तेवढीच नाराजी व्यक्त होत आहे. दुसऱ्याबाजूने डागडुजीचे काम रखडल्याने या रस्त्यावरील खड्डे दिवसेंदिवस रुंदावत असून, रस्ता खिळखिळा बनत चालला आहे. साखळी पुलाजवळील विठ्ठलापूर येथील रस्त्याची तर पुरती चाळण झाली आहे. डागडुजी करण्यात आलेला कुळण येथील रस्ताही पुन्हा उखडायला सुरवात झाली आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस दिवसेंदिवस धोकादायक बनत आहे.

डागडुजीचे काम स्थगित

डिचोली-साखळी हा मुख्य रस्ता विविध ठिकाणी उखडलेला असून, या रस्त्याच्या मागे खड्डयांची ''पनवत' लागलेली आहे. आठ दिवसांपूर्वी म्हणजेच गेल्या रविवारी या रस्त्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले होते. त्या संबंधीचे वृत्तही दै. 'गोमन्तक' मधून प्रसिद्ध झाले होते. कुळण-सर्वण येथे रस्त्यावरील (Road)खड्डेही बुजविण्यात आले आहेत. त्यानंतर मात्र उर्वरित रस्त्याचे काम अचानक सोडून देण्यात आलेले आहे. गेल्या आठ दिवसांपासून डागडुजीचे काम बंद आहे. डागडुजीचे काम नेमके कशामुळे बंद आहे, ते समजू शकत नाही.

खड्डे रुंदावताहेत, वाहनचालकांत नाराजी.
Goa: डिचोली बाजारात चतुर्थीनंतरही ग्राहकांची गर्दी रोडावली

डागडुजीच्या नावाखाली धूळफेक

खड्डे बुजविण्यासाठी रस्त्यावर टाकलेली खडी तशीच पडून आहे. तर रोड रोलर आणि अन्य यंत्रे गायब आहेत. त्यामुळे वाहनचालक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. डागडुजीच्या नावाखाली जनतेच्या (Public)डोळ्यात धूळ फेकण्याचा हा प्रकार तर नव्हे ना? असा प्रश्न वाहनचालक उपस्थित करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa SIR Guidelines
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com