S. Jaishankar to Bilawal Bhutto in SCO Summit Goa 2023
S. Jaishankar to Bilawal Bhutto in SCO Summit Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

SCO Summit Goa: तुमचा संबंधच काय? परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी बिलावल भुट्टोंना फटकारले; पाहा व्हिडिओ...

Akshay Nirmale

SCO Summit Goa 2023: गोव्यातील शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) परिषदेच्या बैठकीत शुक्रवारी अखेरच्या दिवशी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो (Bilawal Bhutto) यांना कडक शब्दांत खडसावले. ज्या गोष्टीशी तुमचा संबंधच नाही, त्यावर कशाला बोलता, अशा शब्दांत जयशंकर यांनी भुट्टो यांना फटकारले.

(S. Jaishankar to Bilawal Bhutto in SCO Summit Goa)

SCO बैठकीसाठी आलेल्या बिलावल भुट्टो झरदारी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या G20 बैठकीबाबत वक्तव्य केले. त्यावर पाकिस्तानचे नाव न घेता एस. जयशंकर म्हणाले की, 'आम्हाला कोणाशीही G20 वर चर्चा करण्याची गरज नाही, विशेषत: ज्या देशाचा G20 शी काहीही संबंध नाही, त्या देशाशी तर बिलकुलच नाही.'

जयशंकर म्हणाले की, जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांप्रमाणेच G-20 ची बैठक जम्मू-काश्मीरमध्येही होत आहे. यात काही वेगळे किंवा असामान्य असे नाही.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी हे एससीओ सदस्य देशाचे परराष्ट्र मंत्री या नात्याने इतर सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांप्रमाणे वागले. पण ज्या देशामुळे दहशतवादाची समस्या आहे, अशा देशाचे प्रवक्ते म्हणून त्यांच्या (पाकिस्तानच्या) भूमिकेला विरोध करण्यात आला.

जयशंकर म्हणाले, 'त्यांचा G-20 शी काही संबंध नाही, श्रीनगरशीही त्यांचा काही संबंध नाही. काश्मीरबाबत बोलायचे तर केवळ एका प्रश्नावर चर्चा होऊ शकते, ती म्हणजे पाकिस्तान पीओकेवरील अवैध कब्जा कधी संपवणार? या गोष्टीवर.

दहशतवादाचा शस्त्र म्हणून वापर करू नका, असे बिलावल भुट्टो म्हणाले होते. त्यावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले होते की, 'या वक्तव्यावरून ते दहशतवादाचे समर्थन करत आहेत, असे दिसते. आम्ही दहशतवादाला प्रोत्साहन देणााऱ्या देशाशी शांततेची चर्चा करू शकत नाही, असा टोलाही जयशंकर यांनी लगावला.

पाकिस्तान आणि चीनमधील कथित कॉरिडॉरच्या संदर्भात बोलताना जयशंकर यांनी कनेक्टिव्हिटी कोणाच्याही सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडत्वाचे उल्लंघन करू शकत नाही, असे स्पष्ट केले.

SCO शी संबंधित 100 हून अधिक बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. जुलैमध्ये SCO शिखर परिषद होणार आहे. SCO मध्ये इराण आणि बेलारूसच्या सदस्यत्वावरही चर्चा झाली आहे, असेही जयशंकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News : अवाजवी शुल्क आकारणाऱ्या शैक्षणिक संस्‍था निशाण्यावर; मुख्‍यमंत्र्यांनी दिला कडक कारवाईचा इशारा

Panaji News : दहावी झाली, आता पुढे काय? स्मार्ट निर्णय घ्या; व्यावसायिक, औद्योगिक संस्थांचे पर्याय

PM Modi Interview: ‘’पाच वर्षे राजकारण करु नये’’: पंतप्रधान मोदींची बेधडक मुलाखत; प्रत्येक प्रश्नांची दिली दिलखुलास उत्तरे

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

SCROLL FOR NEXT