Tourist Assaulted in Goa: महिला सोबती देतो, असे सांगून शिमल्याच्या पर्यटकाला लुटले; नाईटक्लबमध्ये जबर मारहाण

पर्यटक तरूणाने शेअर केला भयाण अनुभव; कळंगुट पोलिसांत गुन्हा दाखल
Shimla Tourist Assaulted in Goa
Shimla Tourist Assaulted in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Shimla Tourist Assaulted in Goa: गोवा हे देशातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे देशभरातून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. गोव्यातील किनारी भागांमध्ये पर्यटकांना विविध आमिषे दाखवून लुटण्याच्या घटना घडत असतात.

असाच एक प्रकार कळंगुटमधून समोर आला आहे. येथे शिमल्याच्या एका पर्यटक तरूणाला 'महिला सोबती देतो' असे सांगून लुटले गेले. या पर्यटकाला नाईटक्लबमध्ये जबर मारहाण केली गेली आहे.

प्रणव शर्मा असे या पर्यटक तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रणव शर्मा याला महिला सोबती देतो, असे सांगून विश्वासात घेतले गेले, नंतर त्याची फसवणूक केली गेली.

Shimla Tourist Assaulted in Goa
Bilawal Bhutto India Visit: बिलावल यांचं आजोळ आणि गोव्याचं खास कनेक्शन तुम्हाला माहितीये? पाकिस्तानमध्ये आहे गोमंतकीयांची वस्ती...

प्रणव शर्मा हा 1 मे रोजी शिमल्याहून गोव्यात आला होता. एका अनोळखी व्यक्तीने त्याला महिला सोबती पुरवतो, असे सांगितले. त्यावर दोघांमध्ये बोलणी होऊन प्रणव शर्माने त्या अनोळखी व्यक्तीला 3,500 रूपये दिले. त्यावर अनोळखी व्यक्तीने प्रणव याला 2 मे रोजी मध्यरात्री एका क्लबमध्ये "महिला सोबती" मिळेल असे सांगितले.

प्रणव त्या क्लबमध्ये गेल्यावर त्याला कळले की त्याची फसवणूक झाली आहे. त्याने संबंधित नाईट क्लब ऑपरेटरकडे परतावा मागितला. ऑपरेटरने त्याला 2,000 रुपये परत दिले. तथापि, उर्वरीत रक्कम परत दिली नाही. त्यावरून प्रणव याचे तिथे भांडण झाले.

त्यामुळे तेथील बाऊन्सर आणि इतर अज्ञातांनी मिळून प्रणव याला मारहाण केली. याची वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिली.

Shimla Tourist Assaulted in Goa
Sexual Assault Case: पोलीस असल्याचे सांगून 5 वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप, आता झाली निर्दोष मुक्तता

त्यानंतर प्रणव याने पोलिस ठाण्यात धाव घेत घडला प्रकार सांगितला. पोलिसांनी अज्ञातांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. काही संशयितांवर कारवाई केली असून क्लब ऑपरेटरची चौकशी केली जाईल, असेही पोलिसांनी सांगितले आहे.

गोव्यात विविध बीचलगत डान्स बार आणि बेकायदेशीर मसाज पार्लर आहेत. मसाज सेवा, महिला साथीदार किंवा डान्सबारमध्ये विशेष प्रवेशाचे आश्वासन देत अनेक दलालांकडून फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. आर्थिक फसवणुकीसह मारहाणीचे प्रकारही यापुर्वी घडले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com