मडगाव: विदेशात नोकरी मिळवून देण्याची जाहिरात इन्स्टाग्रामवर केली आणि शेख मोहम्मद शोएब हा पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
बड्डे-मडगाव येथे ‘पोर्तुगाल डायरेक्ट’ हे आस्थापन थाटून लोकांना विदेशात पाठवून देण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदा व्यवसायाचा फातोर्डा पोलिसांनी मागच्या आठवड्यात पर्दाफाश केला होता. सदर आस्थापन शोएब याच्या मालकीचे आहे.
त्याला चौकशीसाठी पोलिसांनी ३५३ कलमाखाली नोटीस पाठविली. बंगळुरू येथील प्रोटेक्टर ऑफ इमिग्रंटचे अविनाश शुक्ला यांनी या प्रकरणी फातोर्डा पोलिसांत तक्रार नोंदविली होती.
मागाहून पोलिसांनी छापा टाकला असता या आस्थापनाकडे कुठलाही कायदेशीर परवाना नसल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले होते, जे बड्डे येथील गजानंद केरकर कमर्शिअल कॉम्प्लेक्स येथे सुरू होते.
शेख शोएब याच्या नावावर सदर आस्थापन असून पोर्तुगीज राष्ट्रीयत्व, युरोप व आखातात नोकरी, लंडनमध्ये व्हिसा देणे असा गैरव्यवहार तेथे सुरू होता. इमिग्रेशन कायदा १९८३ कलम १० व २४ अंतर्गत पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. पोलिस निरीक्षक नेथॉन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामराय नाईक पुढील तपास करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.