Goa Online Scam: सिंगापूरातून दिल्लीत उतरला, विमानतळावरच भामट्याला अटक; शिवोलीतील महिलेला घातला होता 1 कोटींचा गंडा

Siolim fraud case: शिवोली येथील एका महिलेला व्हॉट्सॲपवरून आपण दिल्ली क्राईम ब्रँचचा अधिकारी असल्याचे भासवून तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे, असे सांगून १ कोटी रुपयांचा गंडा घातला होता.
Jail Arrest
Jail ArrestDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: शिवोली येथील एका महिलेला व्हॉट्सॲपवरून आपण दिल्ली क्राईम ब्रँचचा अधिकारी असल्याचे भासवून तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे, असे सांगून १ कोटी रुपयांचा गंडा घातला होता.

या प्रकरणातील मास्टरमाईंड अनिल त्रिपाठी याला रायबंदर येथील सायबर क्राईम पोलिसांनी अटक केली आहे. संशयित आरोपीविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आल्याने सिंगापूर येथून दिल्ली येथे विमानतळावर उतरल्यावर संशयिताला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले.

तक्रारीनुसार, २६ ते २८ डिसेंबर २०२४ दरम्यान या महिलेशी संपर्क साधण्यात आला होता. दिल्ली क्राईम ब्रँचचा पोलीस निरीक्षक म्हणून त्याने या महिलेला ओळख सांगितली होती. महिलेविरुद्ध गुन्हा नोंद झाल्याचे सांगून सर्वोच्च न्यायालयाच्या बनावट नोटिसा पाठवण्यात आल्या.

Jail Arrest
Delhi Crime: आई आणि मुलाच्या नात्याला कलंक! मुलानेच आईवर केला दोनदा बलात्कार; म्हणाला, ‘मी तिला शिक्षा दिली...’

दबाव आणून तब्बल १ कोटी रुपये हे तीन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यास भाग पाडले. क्राईम पोलिसांनी ‘डिजिटल अरेस्ट’ प्रकारातील सूत्रधार समजल्या जाणाऱ्या अनिल त्रिपाठीला दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतले.

Jail Arrest
Goa Crime News: वास्कोत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बिहारचे तिघे अटकेत; लाखोंचा मुद्देमाल जप्त

अनिल त्रिपाठी हाच रॅकेटचा मास्टरमाईंड

सिंगापूर येथे राहणारा अनिल त्रिपाठी हा या रॅकेटचा मास्टरमाईंड असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरुद्ध लुक आऊट नोटीस जारी करण्यात आले होते.पोलीस उपनिरीक्षक अनिल पोळेकर व हेड कॉन्स्टेबल अनय नाईक यांच्या पथकाने, पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या देखरेखीखाली दिल्लीमध्ये कारवाई केली. त्रिपाठीला १५ ऑगस्ट रोजी अटक करून गोव्यात आणण्यात आले असून त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com