Goa Recruitment  Canva
गोवा

Goa Recruitment: सुवर्णसंधी! लवकरच तीन हजार पदांची भरती; आयोगाच्या हालचालींना वेग

गोमन्तक डिजिटल टीम

Recruitment By State Government Staff Recruitment Commission Goa

पणजी: राज्‍य सरकार कर्मचारी भरती आयोगाकडून कर्मचारी भरती करणार की खात्यांनाच पुन्हा ते अधिकार दिले जातील, याची एक मोठी चर्चा राज्यात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत तिनेक हजार पदे भरण्यासाठी जाहिराती जारी करण्याची तयारी आयोगाने केली आहे. येत्या काही दिवसांत त्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.सरकारने भरती आयोगाकडे सोपविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यात कोणताही बदल करण्याची सरकारची भूमिका नाही.

उमेदवारांच्या परीक्षेसाठी चाचपणी

महाराष्ट्रात तलाठी भरतीसाठी महिनाभर परीक्षा घ्यावी लागली होती. कारण उमेदवारांची संख्याच जास्त होती. त्याच धर्तीवर राज्यात लिपिक पदासाठी हजारो उमेदवार अर्ज करून शकतात, असे गृहित धरून ती परीक्षा किती दिवस घ्यावी लागेल, याचा अंदाजही आयोगाकडून घेतला जात आहे. त्याचमुळे तीन हजार पदे भरायची असली तरी त्याच्या जाहिराती एकाचवेळी प्रसिद्ध केल्या जाणार नाहीत. एकेक पद्धतीची पदे भरल्यानंतर पुढील पदे भरण्यासाठीची प्रक्रिया आयोग सुरू करणार आहे.

संगणकाधारीत परीक्षा पद्धती

आयोगाकडून पदे संगणकाधारीत परीक्षेद्वारे भरण्यात येणार आहेत. प्रत्येक पदासाठी वेगवेगळी प्रश्नपत्रिका तयार केली आहे. परीक्षा घेतल्यावर अल्पावधीतच उमेदवाराला निकाल कळण्याची व्यवस्था केली जाणार आहे. मात्र, एकाच पदासाठी शेकडो उमेदवार असतील तर मात्र सर्वांची परीक्षा देऊन झाल्यावरच निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News: गोव्यात दुरुस्तीच्या कामांमुळे 'या' परिसरामध्ये राहणार वीजपुरवठा खंडित; कार्यालयाने दिले वेळापत्रक

Top 5 Longest Range Missile: जगातील 'ही' 5 लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे उडवतात धास्ती!

...प्रत्येकाचा रावण वेगळा, दहनाचे मार्ग वेगळे, लुटण्याचे सोनेही वेगळेच, समान घटक फक्त मायबाप मतदार; संपादकीय

Yellow Alert In Goa: गोव्यात दोन दिवस 'यलो अलर्ट', वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; गोमंतकीयांना सतर्कतेचा इशारा

Digital Goa: इंटरनेट वापरात गोवा अव्वल! ऑनलाईन बँकिंगचं प्रमाण वाढलं; दुसऱ्या क्रमांकावर 'हे' राज्य!

SCROLL FOR NEXT