Food  Dainik Gomantak
गोवा

Calangute Baga: नाताळच्या पार्टीत हॉटेल कर्मचाऱ्यांना अन्नातून विषबाधा; 15 जणांची प्रकृती चिंताजनक

प्रकृती चिंताजनक असल्याने सर्वांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

Pramod Yadav

Calangute Baga: नाताळनिमित्त आयोजित पार्टीत हॉटेलमधील 15 कर्मचाऱ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. कळंगुट बागा येथील हॉटेल कर्मा मोंतेरो या हॉटेलमध्ये मंगळवारी (दि.20) रात्री ही घटना घडली. सर्व कर्मचाऱ्यांवर कांदोळी येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती चिंताजनक असल्याने सर्वांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

(Food Poisoning to hotel staff at Calangute Baga)

मिळालेल्या माहितीनुसार, कर्मा मोंतेरो या हॉटेलमध्ये मंगळवारी नाताळनिमित्त एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीत कर्मचाऱ्यांना जेवण देण्यात आले. पण, जेवण झाल्यानंतर जेवण केलेल्या पुरूष व महिलांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. तात्काळ सर्व कर्मचाऱ्यांना कांदोळी येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अतिदक्षता विभात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, घडलेल्या प्रकाराबद्दल हणजूण येथील मारियानो फर्नांडिस यांनी कळंगुट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हॉटेल व्यवस्थापनाने निकृष्ट दर्जाचे अन्न दिल्याने सर्वांना विषबाधा झाली असे या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून योग्य कारवाई करावी अशी मागणी फर्नांडिस यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री गोविंद गावडेंच्या कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Today's Live Updates Goa: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत दीपराज गावकर करणार गोव्याचं नेतृत्व!

CM Pramod Sawant: गोमंतकीयांनो सावधान, भुलथापांना बळी पडू नको; वाढत्या फसवणूकीच्या घटनांवर मुख्यमंत्र्यांचे आवाहन

St. Xavier Exposition: शव प्रदर्शनाला 8 दशलक्ष लोकं हजेरी लावण्याची शक्यता; गोव्यात होणार 45 दिवसांचा भावदीव्य सोहळा

Govind Gaude: मंत्री गोविंद गावडेंच्या अडचणी वाढणार? Cash For job Scam प्रकरणात कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT