CM Pramod Sawant : अल्पवयीन वाहन चालकांच्या पालकांना घडणार अद्दल; थेट होणार अटक

मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा राज्यात घडत असलेल्या अपघांतामध्ये अल्पवयीन वाहन चालक असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर गोवा सरकार अॅक्शन मोडमध्ये असून अशा वाहन चालकांवर कारवाई होणार आहे, तसेच त्यांच्या पालकांवर अटक होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज दिली.

(Chief Minister Pramod Sawant has informed that parents will be arrested if minor drivers are found in Goa)

मिळालेल्या माहितीनुसार गोवा सरकारने अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाईसाठी कडक पावले उचलणार असल्याचं स्पष्ट केले आहे. आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत पत्रकार परिषद घेतली असून याबाबत नव्या नियमावलीची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, यापुढे अल्पवयीन मुले वाहने चालवताना सापडल्यास त्यांच्या पालकांवर थेट अटकेची कारवाई होणार आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांना पालकांनी वाहने देउ नयेत. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच काही ठिकाणी खासगी वाहने पर्यटकांना भाड्याने दिली जात असल्याचे समोर आले आहे. अशी वाहने आढळल्यास कारवाई होणारच शिवाय जप्त केलेली वाहने परत मिळणार नाहीत. असे मुख्यमंत्र्यांनी आज स्पष्ट केले आहे.

दरम्यान वास्कोमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील दोन अपघातांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग दिसून आला होता. इतकंच नाही तर या दोन्ही अपघातांमध्ये दोघांचा मृत्यूही झाला होता. या प्रकरणात अल्पवयीन आरोपींवर नाही तर थेट त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. यानंतर आता गोवा सरकारने नियम कडक केले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com