FDA  Dainik Gomantak
गोवा

Goa FDA Raid: ‘एफडीए’कडून दोन वर्षांत 1841 छापे, 2023 मध्ये दंडात्मक रकमेत पिछाडी

FDA raids Goa: प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ‘एफएसएसएआय’च्या सहकार्याने ‘एफडीए’कडे अत्याधुनिक ‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ या दोन मोबाइल प्रयोगशाळा उपलब्ध आहेत.

Sameer Panditrao

पणजी: अन्न व औषध प्रशासनाकडून २०२२ ते २०२४ या दोन वर्षांत अस्वच्छ, भेसळयुक्त किंवा कालबाह्य पदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर १,८४१ छापे टाकण्यात आले.

२०२३ या वर्षात १.५५ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. राज्यभरातील केक, पेस्ट्री, मिठाई, फास्ट फूड आउटलेट्स, गाड्या, आठवडी बाजार यासह विविध ठिकाणी अन्न व पेय पदार्थांच्या गुणवत्तेच्या तपासणीसाठी ही कारवाई करण्यात आली.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ‘एफएसएसएआय’च्या सहकार्याने ‘एफडीए’कडे अत्याधुनिक ‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ या दोन मोबाइल प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. या प्रयोगशाळांद्वारे स्थानिक बाजारपेठा आणि दुर्गम भागांमध्ये खाद्यपदार्थांची त्वरित चाचणी करता येते. नागरिकांना नाममात्र शुल्क भरून त्यांच्या अन्न पदार्थांचे परीक्षण करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एफडीएची पावले

एफडीए अधिकारी आणि अन्न सुरक्षा पथके राज्यातील दोन्ही जिल्ह्यांमध्ये अचानक तपासण्या करतात. यावेळी अन्न व्यवसाय ठिकाणांची तपासणी, परवाना नसलेल्या व्यवसायांविरोधात कारवाई, फळे, भाजीपाला, मासे, पॅकेज्ड खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन चाचणी, अन्नसुरक्षेवरील जनजागृती अभियान आणि पुन्हा वापरण्यात येणाऱ्या वापरलेल्या तेलाच्या तपासण्या केल्या जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT