Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: म्हादईप्रश्‍नी केंद्राकडे पाठपुरावा सुरू - मुख्यमंत्री

लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपचेच सरकार निवडून येईल, असा दावा सावंत यांनी केला.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हादईप्रश्‍नी केंद्र सरकारकडे सक्षमपणे पाठपुरावा करण्यात येत आहे. या लढ्यामध्ये आता महाराष्ट्र राज्याचीही साथ मिळत असल्याने गोवा सरकारच्या वतीने कायदेशीर प्रक्रियेबरोबर राजकीय आणि तांत्रिक आघाड्यांवर मात करत ही लढाई आम्ही जिंकू, असा विश्‍वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

वास्को येथे भाजप राज्य कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपचेच सरकार निवडून येईल, असा दावा सावंत यांनी केला. या बैठकीत केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत पोचवण्याचा संकल्प करण्यात आला.

प्रामुख्याने अंत्योदय तत्त्वावर विकासाची दिशा, आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा या तत्त्वानुसार कार्य करण्याचे ठरले असून पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांसह कार्यकर्त्यांनीही या कामी स्वत:ला वाहून घ्यावे, असेही मुख्यमंत्री सावंत यावेळी म्हणाले. या बैठकीत महिला आणि युवकांना कौशल्य विकासामध्ये सक्षम करण्यावर भर देण्याचे ठरले असून स्वयंपूर्ण गोव्यासाठी युवक आणि महिलांनी उद्योजकतेकडे वळावे, असे सांगण्यात आले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: आजी-माजी प्रदेशाध्यक्ष शेजारी-शेजारी!

Parliament Monsoon Session: संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून; मतदारसंघ फेररचना विधेयक पुन्हा मांडले जाण्याची शक्यता

Goa Housing Society: सोसायटीतील भांडणं, तक्रारी आणि वादांना मिळणार पूर्णविराम! सरकार स्थापन करणार 'सहारा' प्राधिकरण

Shreyas Iyer: 4 सामन्यात एकही विजय नाही... सरपंच साहेबांना यशाचा सूरच गवसेना! श्रेयस अय्यरच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

Goa Rainfall: राज्यात गेल्या 24 तासांत सरासरी 23.9 मिमी पावसाची नोंद, 30 इंचांचा टप्पा पार; चार दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी

SCROLL FOR NEXT