CM Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Porvorim Flyover: दोन वर्षांत पर्वरीत उड्डाण पूल; मुख्यमंत्री सावंत

CM Dr. Pramod Sawant: उड्डाणपुलाच्या बांधकामावेळी वाहतूक सुरळीत राहील याची काळजी घेण्यात येणार

गोमन्तक डिजिटल टीम

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केलेल्या पाहणीनंतर काम बंद पडले, असे दिसणाऱ्या पर्वरीतील पाच किलोमीटरच्या उड्डाणपुलाचे काम येत्या दोन वर्षात पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पर्वरी येथे मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

ते म्हणाले, वाहतूक व्यवस्थापन हा तेथील मुख्य प्रश्न होता. उड्डाणपुलाचे काम सुरु झाल्यावर पर्यायी मार्गे वाहतूक कशी वळवली जाणार, याचा आराखडा तयार झाल्याने आता उड्डाणपुलाचे काम गतीने पुढे सरकण्यास कोणतीही हरकत राहिलेली नाही. लोकप्रतिनिधी व स्थानिकांना विश्वासात न घेता कंत्राटदाराने उड्डाणपुलाचे काम सुरू केल्याबद्दल मंत्री रोहन खंवटे नाराजी व्यक्त केली होती.

वाहतूक व्यवस्थापनाचा आराखडा तयार होईपर्यंत काम बंद ठेवण्याची मागणी त्यांनी केली होती. त्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले, मंत्री खंवटे यांनी उपस्थित केलेल्या समस्यांवर उपाय काढण्यात आलेला आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामावेळी वाहतूक सुरळीत राहील, याची काळजी घेण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dawood Ibrahim: दाऊद इब्राहिम भारतात? UNच्या रिपोर्टवर भारताचा तीव्र आक्षेप, कडक शब्दात ताकीद देत केला थेट सवाल

North Goa Final Voter List: उत्तर गोव्याची अंतिम मतदारयादी 4 जानेवारीला; वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्याची संधी

Bhuvneshwar Kumar World Record: भुवनेश्वर कुमारचं टीम इंडियात कमबॅक! तब्बल 1,430 दिवसांनंतर केली गोलंदाजी, पहिल्याच 2 चेंडूंवर नोंदवला विश्वविक्रम

Goa Under 23 Cricket: दिशांक मिस्कीनची एकाकी झुंज! नाबाद 97 धावांसह गोव्याला बिहारविरुद्ध विजयाची संधी

Ranji Trophy 2026: 40 पैकी 38 विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या; गोव्याच्या फलंदाजांची रणजीत दयनीय अवस्था

SCROLL FOR NEXT